दान संचिती
सुखावला हा जीव की मग जाणवते कधी तरी तुला, आठवण माझी येते असह्य विरहास मी नित्य सरावलेला तरीही आठवांचे आभाळ भरुनी येते अशक्य असते, सारे काही विसरणे हृद्य अंतरीचे रुतलेले, उचंबळूनी येते आज संवेदना जाहल्या साऱ्या मुक्या तरीही अव्यक्त सहज नेत्री दाटूनी येते कातरवेळा! ही सांजाळलेली भाबडी गतस्मृतींनाच, आसमंती उधळीत येते हाच खेळ, अनामिक अतर्क्य जीवनी […]