गफूरभाई
दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी नारायण पेठेतील संस्कृती प्रकाशनच्या ऑफिसमध्ये काम करीत होतो. एके दिवशी दुपारी कुरळ्या केसांना भांग पाडलेला, सावळ्या रंगाचा, उंचापुरा माणूस समोर येऊन उभा राहिला. अंगात पांढरा झब्बा, त्यावर निळ्या रंगाचं जाकीट, खाली पांढरी सुरवार व पायात चपला. त्यांना मी ‘या, बसा’ म्हटलं. सुमारे सव्वीस वर्षांनंतर गफूरभाई पुणेकर मला भेटत होते. […]