क्रिकेटपटू मुश्ताक अली
वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांनी हॅट्रिक घेऊन आणि ६५ धावा करून फर्स्ट क्लास क्रिकेटची सुरवात केली. १९३६ साली ते इंग्लंडच्या टूरवर गेले तेव्हा ते २१ वर्षाचे होते. मुश्ताक अली पहिला कसोटी सामना ५ जानेवारी १९३४ रोजी इंग्लंडविरुद्ध खेळले. त्यावेळी त्यांनी ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर ११२ धावा केल्या. सामना संपल्यावर लेखक सर नेव्हिल कार्डस यांनी लिहिले ,’ मुश्ताक अली यांची खेळी सर्व फटक्यांनी परिपूर्ण होती आणि त्या फटक्यात जे लखलखणारे तेज होते त्यावरून भारतीयांच्या डोळ्यातील तीक्ष्णता जाणवली . मुश्ताक यांनी आपल्या हातातल्या बॅटचे रूपांतर जादूगाराच्या कांडीत केले !’ […]