अभिनेत्री सुरय्या
सूरय्या …तिचा मी लहानपणी रुस्तम-ए- सोहराब पहिला होता..का कुणास ठाऊक मला ती खूप आवडू लागली…मी तिचा हा चित्रपट खूप वेळा पहिला..एक दिवस मी वानखेडे Stadium ला गेलो असताना मला कळले ती कोपऱ्यावर राहते, […]
सूरय्या …तिचा मी लहानपणी रुस्तम-ए- सोहराब पहिला होता..का कुणास ठाऊक मला ती खूप आवडू लागली…मी तिचा हा चित्रपट खूप वेळा पहिला..एक दिवस मी वानखेडे Stadium ला गेलो असताना मला कळले ती कोपऱ्यावर राहते, […]
उस्तादजींना त्यांच्या वडीलांकडून अनेक वाद्याचे प्रशिक्षण मिळाले पण ते सरोदकडे जास्त आकर्षित झाले .त्यांचे वडील अलाउदिन खान कडक शिस्तीचे होते. पहाटेच त्यांचे संगीताचे धडे सुरु होत ते अठरा तास चालत. उस्तादजी तबला आणि पखवाज त्यांच्या काकांकडून आफताबुददीन खान यांच्याकडून शिकले. सुप्रसिद्ध सरोद वादक तामीर बरन आणि सुप्रसिद्ध बासरीवादक पन्नालाल घोष यांच्याकडेही शिकले त्यावेळी ते शिबपूर येथे येत असत. […]
भाऊसाहेब पाटणकर यांना ‘ जिंदादिल ‘ भाऊसाहेब पाटणकर म्ह्णून ओळखले जात होते. मराठीत गजल मोठ्या प्रमाणात लिहली जात असताना स्वतंत्र शेर मात्र कमीच म्हणजे जवळ जवळ लिहीले जात नसत . गंमत म्हणजे गजलांचा सुकाळ व्हायाच्या आधी मराठीत उच्च दर्जाचे शेर लिहणारा एक जबरदस्त शायर निर्माण झाला होता तो शायर म्हणजे भाऊसाहेब पाटणकर ते यवतमाळ येथे रहावयास होते. […]
सुहास शिरवळकर यांच्या ‘दुनियादारी ‘ या कादंबरीवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांचे आहे. या मल्टी स्टार कास्ट चित्रपटात अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी, जितेंद्र जोशी, सई ताह्मणकर, उर्मिला कानेटकर, संदीप कुलकर्णी, सुशांत शेलार आणि वर्षा उसगावकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. […]
३१ मे रोजी एकदम सर्वत्र क्रांतियुद्धाला प्रारंभ करण्याची श्रीमंत नानासाहेब पेशवे आदींची योजना होती. मात्र १९ व्या पलटणीतील स्वदेशबंधूंचा आपल्यादेखत अपमान व्हावा, ही गोष्ट मंगल पांडे यांना आवडली नाही. मार्च २९, १८५७ रोजी कवायतीच्या मैदानावर मंगल पांडे बराकपूर छावणीत ब्रिटिश करत असलेल्या अन्यायाविरुद्ध देशी सैनिकांना उत्तेजित करू लागले. “मर्दहो, उठा !” अशी गर्जना करून ते सैनिकांना म्हणाले, “आता माघार घेऊ नका. बंधूंनो, चला तुटून पडा ! तुम्हाला तुमच्या धर्माची शपथ आहे !! चला, आपल्या स्वातंत्र्यासाठी शत्रूचा निःपात करा!!!” […]
त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेट हे दोन महायुद्धाच्या मधल्या कालखंडात खेळले. त्या काळात क्रिकेटच्या खेळाडूंना खूप प्रसिद्धी मिळत असे. ते जेव्हा अपील करत असत तेव्हा त्यांचा आवाज हा मोठा होता , अपील करताना ते मोठयाने विशिष्ट शब्द म्हणजे ‘ ऑझ दॅट ‘ हे शब्द बोलत . ह्याचा खरा उच्चार ‘ हाउज दॅट ‘ असे . पुढे तो शब्द खूप पॉप्युलर झाला. त्यामुळे ते अनेकांच्या लक्षात रहात असत. […]
जहाजावर सगळ्या टाक्या किंवा जिथे जिथे बाहेर जाण्यासाठी दरवाजे असतात त्यांना वॉटर टाईट डोअर्स असे म्हणतात. वॉटर टाईट म्हणजे जहाज बुडाले तरी आत अकोमोडेशन किंवा एखद्या स्टोअर रूम मध्ये पाणी येऊ नये एवढे मजबूत दरवाजे असतात. मजबूत असल्याने ते खूप वजनदार आणि भारी भक्कम असतात. जहाज हेलकावत असताना हे दरवाजे अत्यंत काळजीपूर्वक उघडावे लागतात, वाऱ्यामुळे किंवा जहाजाच्या हेलकावण्यामुळे हे दरवाजे बंद होताना जोरात आदळले जातात. सेकंड मेट घरी जाण्याच्या तंद्रीत असल्याने अप्पर डेक मधून आत अकोमोडेशन मध्ये येताना त्याचे थोडेसे दुर्लक्ष झाले, एक पाय बाहेर असताना वॉटर टाईट डोर जहाज हेलकावल्या मुळे एवढ्या जोरात आदळले की सेकंड मेटला दरवाजावर नियंत्रण ठेवता आले नाही. दरवाजा आदळून बंद होत असताना त्याचा डावा पाय बाहेर होता आणि परिणामस्वरूप त्याच्या पायावर वॉटर टाईट डोअर एवढ्या जोरात आदळला की पायाचे हाड मोडल्याचा त्याला स्वतःलाच आवाज आला. त्याच्या तोंडातून जोरात किंकाळी निघाली ती ऐकून पायलट माघारी फिरला आणि त्याने सगळा प्रकार बघून ब्रिजवर कॅप्टनला वॉकी टॉकी वर कॉल करून ताबडतोब माहिती दिली. […]
आपल्या भारत देशाने जगाला अनेक गणितज्ञ आणि खगोल वैद्यानिक दिले आहेत. अश्या थोर असामी पैकी एक आहेत डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर. डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर हे एक थोर शास्त्रज्ञ तर आहेतच पण उत्तम लेखकही आहेत. त्यांनी फक्त विज्ञान विषयावर गंभीर पुस्तकेच नाही लिहिली तर विज्ञानाची छटा असलेल्या कादंबऱ्या सुद्धा लिहिल्या आहेत. जयंत विष्णू नारळीकर यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. […]
प्रा.रंगनाथ पठारे यांचे आजच्या मराठी साहित्यात अव्वल स्थान आहे. श्रेष्ठ दर्जाचे कादंबरीकार, कथाकार, समीक्षक आणि विचारवंत म्हणून गेली ४० वर्षे ते अविरतपणे योगदान देत आलेत. सुमारे चाळीस हून अधिक मौलिक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. कथा आणि कादंबरी या दोन्ही साहित्यप्रकारांत ते लेखन करतात. […]
लेखकांमध्ये प्रत्येक पिढीनुसार, नवे जुने ‘बाप’लेखक असू शकतात. मी आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, उद्धव ज. शेळके यांचं साहित्य वाचलं. खरंच ती माझ्या दृष्टीनं ‘बाप’माणसंच होती. त्यांची पुस्तकं वाचूनच मला लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यांची लेखनशैली आत्मसात करण्याचा मी प्रयत्न केला. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions