बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर
१९५० ते ७० या काळात भारतीय बॅडमिंटनच्या क्षितिजावर एकच नाव तळपत होते, ते म्हणजे.. नंदू नाटेकर त्याकाळी आपल्या शैलीदार खेळाने नाटेकरांनी बॅडमिंटनमध्ये भारताची ओळख निर्माण केली. देशाबाहेरील स्पर्धेत अजिंक्यपद मिळविणारे ते पहिले भारतीय बॅडमिंटनपटू. राष्ट्रीय स्पर्धात पुरुष दुहेरीत व एकेरीत मिळून १२ वेळा, तर मिश्र दुहेरीत पाच वेळा त्यांनी अजिंक्यपद मिळवले.हल्ली बॅडमिंटनमधील यशामुळे खेळाडूंना अफाट लोकप्रियता मिळू लागली असली तरी नाटेकर हे भारतीय बॅडमिंटनमधले ‘पहिले सुपरस्टार’ होते असेच म्हणावे लागेल . […]