नवीन लेखन...

मराठी लेखक सुहास शिरवळकर यांचा स्मृतिदिन.

सुहास शिरवळकर हे एक जबरदस्त लोकप्रिय लेखक होते. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर ‘पुण्यापासून गोव्यापर्यंत आणि पुण्यापासून नागपूरपर्यंत मी चालत गेलो तर प्रत्येक गावात मला माझा चाहता भेटेल. मला हॉटेलात जेवावं लागणार नाही. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या ‘ दुनियादारी ‘ या पहिल्याच कादंबरीला भरपूर लोकप्रियता लाभली आणि लेखक म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. […]

मेघदूत काव्य

मेघदूत या महाकवी कालिदासाच्या अजरामर कलाकृतीचा जन्म झाला तो रामगिरीवर अर्थात सध्याचं रामटेक. मेघदूत हे दूतकाव्य तसेच विरह काव्यसुद्धा. या मेघदूत काव्याचा नायक यक्ष कुबेराच्या शापामुळे आपल्या प्रिय पत्नीपासून दूर एकांतवासात एका वर्षासाठी रामगिरीवर राहत असतो. पत्नीचा विरह त्याला सहन होत नाही. अशातच त्याला आषाढाच्या पहिल्या दिवशी आकाशात मेघ दिसतो. आपल्या पत्नीपर्यंत आपला खुशालीचा निरोप देऊ शकेल, पोहोचवू शकेल अशा विचाराने मेघाला दूत बनवायचं यक्ष ठरवतो. […]

महाकवी कालिदास जयंती

आज आषाढ मासारंभ होत आहे़. हा महिना जसा शेतकऱ्यांच्या, अध्यात्मिक भाविकांच्या दृष्टीने महत्वाचा आहे, तसाच तो साहित्य विश्वाच्याही दृष्टीने महत्वपूर्ण ठरणारा आहे़ आज आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजे आजची तिथी ही महाकवी कालिदास जयंती अलिकडे  ‘संस्कृत दिन’ म्हणूनही साजरा केला जातो. संस्कृत साहित्यातील मैलाचा दगड ठरलेली ‘मेघदूतम’ ही कवी कालिदासांची साहित्यकृती अजरामर ठरली. […]

महाकवी कालिदास दिन

महकवी कालिदास यांचे वाङमय प्रसिद्ध असले, तरीदेखील त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. त्यांच्याबद्दल एक लोककथेनुसार अशी आख्यायिका आहे की, विद्योत्तमा नावाच्या एका राजकुुमारीने जो तिला शास्त्रार्थात हरवेल त्याच्याशी लग्न करायचे ठरवले होते. राज्यातील सर्व विद्वानांना ती हरवते. तिचा सूड उगवण्यासाठी राज्यातील सर्वात मूर्ख व्यक्तीचा शोध घेऊन, त्याला जिंकवून तिचा विवाह लावून दिला जातो. कालांतराने हे जेव्हा तिला कळते तेव्हा ती व्यक्तीचा अपमान करते. ती म्हणते, ‘अस्ति कश्चित् वाग्‌विशेषः? आपल्या वाणीमध्ये काही विशेषत: आहे?’ राजकन्या रागात त्या व्यक्तीला हाकलून देते. […]

आकृती, प्रकृती, विकृती.. (मी तो आणि ती)

त्याचा दोनदा फोन येऊन गेला. मी जास्त एन्टरटेन त्याला केले नव्हते. पण तो डोक्यावरच बसला. ठरल्या वेळेला आलेला माणूस 65-68 वर्षाचा असेल. खूप थकलेला दिसत होता. मला म्हणाला सर माझी सही बघता का ? […]

संधिप्रकाशातील सावल्या – २ : येऱ्हवी जग हे कर्माधिन…

अश्वत्थानं गोष्ट संपवली आणि सावलीत बसलेल्या त्या तरुणाकडे पाहिलं . त्याच्या डोळ्यातून पाणी वहात होतं . नेहमीप्रमाणं संधिप्रकाशातील सावल्या घनदाट होऊ लागल्या होत्या . सगळी झाडं , क्षितिजाकडे नजर रोखून सूर्य अस्ताला जाण्याची वाट पहात होती . […]

जगन्नाथ अष्टकम्- मराठी अर्थासह

एक एकट्या देवतेची (उदा. हनुमान) किंवा जोडींची (उदा. शंकर-पार्वती, राम-सीता, राधा-कृष्ण,विठ्ठ-रुक्मिणी) मंदिरे आपण सर्वत्र पहातो. परंतु भाऊबहीण यांचे मंदिर क्वचितच दिसते. असे एक मंदिर आहे जगन्नाथपुरीचे कृष्ण-बलराम-सुभद्रा यांचे. […]

क्षमतांची संहिता

मानव संसाधन विकासात मानव या शब्दाची व्याख्याच मुळी “क्षमतांचे गाठोडे” अशी केली आहे. काही क्षमता आपल्यात जन्मजात असतात – वंशपरंपरेने आलेल्या! काही आपण विकसित करीत असतो. पण प्रश्न असा आहे की, स्वतःच्या क्षमता आपणांस माहित असतात का? बऱ्याच जणांना माहित नसतात हे या प्रश्नाचे खरे आणि म्हणूनच कदाचित न आवडणारे उत्तर आहे. […]

सोसायटी मध्ये गटबाजी झाल्यास होणारे परिणाम

गृहनिर्माण संस्थेच्या कामात गटबाजी असता कामा नये. सदस्यांना आपल्या संस्थेबाबत प्रेम असणे गरजेचे आहे. तरच संस्था चांगल्या प्रकारे चालविण्यास मदत होते. अन्यथा काही वर्षातच संस्था ही त्रयस्थ व्यक्ती म्हणजेच “प्राधिकृत व्यक्ती” यांची नियुक्ती करावी लागते. परंतु कालांतराने सदस्यांना झालेली चूक समजते. तोपर्यत बराच उशीर झालेला असतो आणि त्यात आपल्याला काही कळत नाही, तर योग्य व्यक्तीला विचारून त्याच्या सल्ल्याने काही कराव, हे सुद्धा बहुसंख्य लोकांना सांगायची तीव्र गरज निर्माण झाली आहे. बऱ्याचदा असे निदर्शनास येते की, उपविधीत सुधारणा करताना क्रमांकामध्ये नजरचुकीने चुका राहून जातात. त्यामुळे पुढील सर्व उपविधी क्रमांक हे बदलतात. आजच्या सत्रात अश्याच काही महत्वाच्या गोष्टीवर प्रकाश टाकणारा लेख आपल्यासाठी. […]

वॉकी टॉकी

दुपारी दोन च्या सुमारास एबी आणि पंपी 3P टॅन्क चे झाकण उघडून तिथे काहीतरी काम करत असताना एबीच्या खिशात असलेला वॉकी टॉकी खाली टॅन्क मध्ये पडला. एबी ला वाटले आता चीफ ऑफिसर आणि कॅप्टन च्या शिव्या खायला लागतील. तो पंपीला म्हणाला कोणाला सांगू नकोस मी खाली जाऊन वॉकी टॉकी घेऊन येतो. पंपी त्याला म्हणाला वेड बीड लागलंय का तुला पन्नास फुटांवरून खाली पडलेला वॉकी टॉकी एकतर फुटला असेल नाहीतर खाली क्रूड ऑईल मध्ये खराब झाला असेल. त्याहीपेक्षा अजून टॅन्क क्लिनिंग व्हायचे बाकी आहे, खाली जाणाऱ्या शिडीवर ऑईल असेल उतरताना किंवा चढताना खाली पडशील. तू काही खाली जाऊ नको आपण सांगू कॅप्टनला. पण एबी काही ऐकेना तो खाली भराभर उतरू लागला आणि खाली टॅन्क मध्ये उतरल्यावर शोधता शोधता खाली पडला. पंपी काय ओळखायचे ते ओळखला आणि त्याने लगेच वॉकी टॉकी वरून कार्गो कंट्रोल रूम मध्ये ड्युटी ऑफिसरला एबी खाली टॅन्क मध्ये उतरला आणि बेशुद्ध पडला असल्याचे कळवले. […]

1 20 21 22 23 24 31
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..