ब्रँडेड स्कुल
सगळ्या शाळांमध्ये असलेल्या सोयी सुविधा एका पेक्षा एक, थ्री स्टार, फोर स्टार किंवा फाईव्ह स्टार हॉटेल सारख्या. चकाचक रिसेप्शन, चकाचक एअर कंडिशन असलेले वर्ग, चकाचक गार्डन, चकाचक मैदान, चकाचक बसेस, चकाचक शिक्षक आणि स्टाफ आणि त्याहून चकाचक त्या शाळेत शिकणारे लहान लहान निरागस विद्यार्थी. पण सगळ्यात जास्त खटकत होत ते म्हणजे अशा या सगळ्या ब्रँडेड शाळा आपापले मार्केटिंग करत होत्या. […]