अमेरिकेचा २४२ वा स्वातंत्र्यदिन
१७७६ साली हा देश ब्रिटीशांच्या शासनातुन मुक्त झाला. २०० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटुनही अजूनही इथे हा दिवस साजरा करण्याचा उत्साह टिकुन आहे. या दिवशी देशाला उद्देशुन राजकीय भाषणे, सार्वजनिक सुट्टी, परेड इथे केले जातात. पण त्याचबरोबर ह्या दिवशी इथल्या मोठमोठ्या शहरात होणारी आकर्षक आतिषबाजी हे मुख्य आकर्षण. देशाची राजधानी वॉशिंग्टन, तसेच मियामी, न्युयॉर्क ह्या शहरांमध्ये होणारी आतिषबाजी बघायला लोकं जगाच्या कानाकोपऱ्यातुन येतात. न्युयॉर्कमध्ये होणारी आतिषबाजी ही सर्वात मोठी आणि आकर्षक मानण्यात येते. १७७६ मध्ये आजच्या दिवशी अमेरिकन वसाहतींमधील प्रतिनिधी सभेने स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला व स्वत:ला ‘स्वतंत्र’ घोषित केले. […]