फायर ऑनबोर्ड
तेलवाहू तसेच केमिकल वाहून नेणाऱ्या जहाजांच्या अकोमोडेशन वर मोठ्या आकारात नो स्मोकिंग ही सूचना लिहलेली असते. लहानपणापासून मुंबईहुन मांडव्याला आणि अलिबागला जाताना लाँच मधून जाताना मुंबईच्या बंदरात उभ्या असलेल्या मोठ्या मोठ्या जहाजांवर एवढ्या मोठ्या अक्षरांत नो स्मोकिंग का लिहलंय याबद्दल प्री सी ट्रेनिंग कोर्सला जाईपर्यंत नेहमीच कुतूहल वाटायचं. […]