नवीन लेखन...

अभिनेते शाहू मोडक

१९३२ मध्ये आलेला ‘ श्यामसुंदर ‘ हा शाहू मोडक यांचा पहिला चित्रपट खूपच गाजला मुंबईच्या थिएटर मध्ये सतत २७ आठवडे चालून रोप्यमहोत्सव करणारा तो अखंड भारतातील पहिला चित्रपट होता. त्यात शाहू मोडक यांनी गायलेले ‘ भावे वरिता गोसेवेला ‘ हे गीत खूपच गाजले […]

फ्युचरग्रुप चे किशोरबियाणी

देशात एक काळ असा होता की प्रत्येक मध्यम वर्गातील कुटुंब बिग बाजारच्या सेलची वाट पाहायचा. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १९६१ रोजी राजस्थानात झाला. कारण या सेलमध्ये महत्त्वाच्या वस्तूंवर मोठी सवलत मिळायची. ‘सबसे सस्ता, सबसे अच्छा’, कंपनीची टॅगलाइनची घरा घरात पोहोचली होती.बिग बाजार हे किशोर बियाणी यांचा ब्रांड होता. रिटेल किंग म्हणून ओळख असलेल्या किशोर बियाणी हे […]

जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर

रिओ ऑलिम्पिकमध्ये नेत्रदीपक कामगिरी करणारी जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर चा जन्म ९ ऑगस्ट १९९३ रोजी त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे झाला. भारताची ‘जिमनॅस्ट क्वीन’ अशी तिची ओळख असलेल्या दीपा कर्माकरने जेव्हा पहिल्यांदा जिम्नॅस्टिक स्पर्धेत भाग घेतला होता तेव्हा तिच्याकडे जोडेदेखील नव्हते. वयाच्या सहाव्या वर्षापासून ती जिम्नॅस्टिक कोच बिश्वेशर नंदी यांच्या मार्गदर्शनात ट्रेनिंग घेत आहे. जन्मापासूनच दीपाचे पाय फ्लॅट आहे आणि […]

जागतिक आदिवासी दिवस

संयुक्त राष्ट्र संघटनाने जागतिक आदिवासी समुदायाच्या अधिकाराच्या रक्षणार्थ १९९३ हे जागतिक आदिवासी वर्ष घोषित केले होते. तसेच, ९ ऑगस्ट हा ‘जागतिक आदिवासी दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी हेच पृथ्वीचे मूळनिवासी आहेत आणि ४६१ आदिवासी जमाती भारतात वास्तव्यास आहेत. आदिवासींच्या जातीत आज आणखी काही जाती समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या प्रेरणेने १९९४-२00५ हे […]

ऑगस्ट क्रांती दिन

इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट, अर्थात क्रांती दिन! स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस. दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी ९ ऑगस्ट १९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती. मुंबईत भऱलेल्या कॉंग्रेस अधिवेशनात महात्मा […]

भारतातील ज्येष्ठ पर्कशनिस्ट (तालवादक) तौफिक कुरेशी

जिम्बे या वाद्याला भारतामध्ये नावारूपाला आणणारे तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर संगीतामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले व उस्ताद अल्लाराखा यांचे सुपुत्र आणि उस्ताद झाकीर हुसेन यांचे लहान भाऊ असलेले सुप्रसिद्ध संगीतकार तौफिक कुरेशी यांनी संगीत क्षेत्रात स्वतःच्या प्रतिभेचा ठसा उमटवला. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १९६२ रोजी झाला. उस्ताद अल्लाराखा आणि उस्ताद झाकीर हुसेन हे त्यांचे गुरु होत. त्यांच्या घरी […]

मराठी रंगभूमीचे जनक नाट्याचार्य विष्णुदास भावे

विष्णुदास भावे यांचे संपूर्ण नाव विष्णु अमृत भावे. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १८१९ रोजी झाला. सांगली संस्थानाचे श्रीमंत चितांमणराव ऊर्फ आप्पासाहेब पटवर्धन ह्यांच्या खाजगीकडे ते नोकर होते. कथा-कविता लिहिण्याचा नाद विष्णूदासांना होता. १८४२ मध्ये कर्नाटकातून ‘भागवत’ नावाची एक नाटकमंडळी सांगलीत आली होती. तिचे खेळ पाहिल्यानंतर तशा प्रकारचे नाट्यप्रयोग काही सुधारणा करून मराठीत केले, तर त्यांचे चांगले […]

हिंदीतील लेखक आणि पटकथाकार मनोहर श्याम जोशी

मनोहर श्याम जोशी हे हिंदी भाषेचे प्रख्यात पत्रकार, लेखक आणि पटकथाकार! मनोहर श्याम जोशी यांना ‘भारतीय दूरदर्शनच्या सोप ओपेराचे जनक’ म्हटलं जातं कारण ‘हम लोग’ आणि ‘बुनियाद’ या दूरदर्शनवरच्या पहिल्या महामालिका त्यांच्याच सिद्धहस्त लेखणीतून उतरल्या होत्या. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १९३३ रोजी अजमेर येथे झाला. भारतीय समाजाचं प्रतिबिंब असणाऱ्या त्या मालिकांनी दर्शकांना अनेक वर्षं बांधून ठेवलं […]

संगीत सूर्य केशवराव भोसले

केशवराव यांचे वडील वैद्यकी करत. कोल्हापुरात भोसले वैद्य म्हणून ते परिचित होते. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १८९० रोजी कोल्हापूर येथे झाला. पण लहानपणीच वडील वारले आणि घराचं घरपण नाहीसं झालं. चार चिमण्या जिवांची जबाबदारी आईवर पडली. दत्तू, केशव, नारायण आणि एक अगदी छोटी लहान बहीण. त्यांच्या आईला मोलमजुरीसाठी घराबाहेर पडणं भाग पडलं. त्यावेळी ‘स्वदेशी हितचिंतक’ नाटक […]

गायिका अपर्णा संत

अपर्णा संत यांचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण श्री बैरागी बुवा, प्रभाकर जोशी. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १९७० रोजी झाला. श्रीमती वसुमती भागवत यांच्याकडे कोरेगाव आणि सातारा येथे झाले. श्रीमद् भगवद् गीतेतील तील तत्त्वज्ञान सांगणाऱ्या पंचवीस हिंदी व पंचवीस मराठी गाण्यांना अपर्णा संत यांनी चाली दिल्या आहेत. सध्या हा कार्यक्रम अपर्णा संत व आर्या आंबेकर सादर करत असतात. […]

1 24 25 26 27 28 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..