नवीन लेखन...

ग्रामीण कथाकार शंकर पाटील

‘धिंड,‘नाटक’,‘मिटिंग’ यासारख्या ग्रामीण कथांच्या रसिकांपर्यंत पोहोचलेल्या शंकर पाटील यांचा जन्म ८ ऑगस्ट १९२६ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथे झाला. शंकर बाबाजी पाटील यां चे शिक्षण तारदाळ (ता. हातकणंगले) व गडहिंग्लज येथे व कोल्हापूर येथे बी. ए. बी. टी. पर्यंत रयत शिक्षण संस्थेच्या शाळांतून अध्यापन केले. त्यानंतर आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर त्यांची नियुक्ती झाली. सुरुवातीस आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर कार्यक्रम […]

टॉम अॅण्ड जेरीचे दिग्दर्शक जीन डेच

ऑस्कर पुरस्कार विजेते चित्रकार आणि टॉम अॅण्ड जेरीचे दिग्दर्शक जीन डेच यांचा जन्म ८ ऑगस्ट १९२४ रोजी झाला. जीन डेच यांचे संपूर्ण नाव युजीन मेरील डेच असं होतं. त्यांनी सुरुवातीला त्यांनी नॉर्थ अमेरिकन एव्हीएशन कंपनीमध्ये ड्राफ्टमन म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी त्यांनी लष्करासाठी काम केलं आणि नंतर त्यांनी वैमानिक होण्याचे प्रशिक्षण घेतलं. १९४४ साली आरोग्याशी संबंधित अडचणींमुळे […]

ज्येष्ठ साहित्यकार सुमती क्षेत्रमाडे

त्यांचा जन्म ७ मार्च १९१३ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील झापडे या गावी झाला. ज्या काळात डॉक्टर आणि साहित्य यांचा फारसा संबंध येत नव्हता आणि साहित्यातही डॉक्टरेट मिळविणे ही तशी दुरापास्तच गोष्ट होती, त्या काळात डॉक्टर आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रांत यशस्वी ठरणारी ही लेखिका. व्यक्तीचे आणि समाजाचे जीवन कथांमध्ये जवळून हाताळता येते असा वैद्यकीय व्यवसाय त्यांनी स्वीकारलेला होता. […]

गर्भ संस्कार

महाभारतामध्ये ‘अभिमन्यू’ ची भूमिका सर्वांना माहितच असेल. गर्भामध्ये राहून चक्रव्यूहचे ज्ञान घेणारा हा अभिमन्यू आपण कसा विसरू शकतो. जन्माला येण्यापूर्वीच इतकी मोठी विद्या आत्मसात करू शकतो. हे कधी-कधी नवलच वाटायचे, पण आज हे सत्य आपण सर्वांनाच समजून चुकले आहे. संस्कारांचे बीजारोपण जन्मानंतर नाही परंतु जन्मापूर्वीच आपण करावे व ते कसे करावे, त्याचे महत्व आपण जाणून घ्यावे. […]

शांतिपाठ – आ नो भद्राः क्रतवो – मराठी अर्थासह

ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातील एकोणनव्वदावे हे सूक्त शांतिपाठ म्हणून ओळखले जाते. यातील ‘ भद्रं कर्णेभिः ’ व ‘ स्वस्ति न इन्द्रो ’ या दोन ऋचा विशेषत्वाने सर्वसामान्यांना परिचित आहेत. या सूक्ताचे रचयिता गौतम राहूगण ऋषी असून देवता विश्वेदेव आहे. परंतु पूषन व मरुत गण यांनाही आवाहन केलेले असून दहाव्या ऋचेत अदिती देवता सर्वव्यापी असल्याचे म्हटले आहे. हे सूक्त जगती, विराटस्थाना व त्रिष्टुभ अशा तीन छंदात रचलेले आहे. ऋचांमधील अक्षरांची संख्याही वेगवेगळी दिसते. ऋग्वेदाखेरीज इतरही धर्मग्रंथांमध्ये हे सूक्त समाविष्ट आहे. […]

कथा ‘अ‍ॅन फ्रँक’ची

आम्ही युरोपच्या ‘टूरवर’ असताना, नेदरलँड ला उतरलो. ‘अ‍ॅन फ्रॅंक हाऊस ‘ नावाने जागतिक प्रसिद्धी पावलेल्या आणि ऐतिहासिक म्युझियम ला भेट देण्यास निघालो.   तेंव्हा हा रस्ता जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य  पर्यटकांनी फुलून गेला होता. इमारतीच्या दर्शनी भागाच्या समोर उभे राहून शेकडो पर्यटक ‘म्युझिअमचे ‘  फोटो काढून घेत होते.  आम्ही प्रथम तिकीट काढून रांगेत उभे राहिलो आणि जेंव्हा त्या ‘वास्तूत ‘ मी पहिले पाऊल टाकले तेव्हा माझे अंग थरारले.  विशेष लक्षवेधी बाबी म्हणजे अ‍ॅन फ्रॅंक हिचे ‘बोलके मंतरलेले  डोळे’ असणारे चित्तवेधक चित्र आणि प्रवेशद्वारा समोरचा ‘पुतळा’. […]

गायक वसंतराव देशपांडे

वसंतराव देशपांडे म्हटले की अनेक नाट्यगीते , ठुमरी आणि शास्त्रीय संगीतातील अनेक प्रकार आठवतात. याबरोबर आठवते ते त्यांचे ‘ कट्यार काळजात घुसली ‘ हे नाटक आणि त्यांनी केलेली खासाहेबांची अविस्मरणिय भूमिका. […]

सेकंड हँड

बंड्या! काहीसा अबोल, फारसा कोणात न मिसळणारा असा एक साधा भोळा, सामान्य मुलगा … तो तसा व्हायला कारणं देखील होती तशीच. दोन खोल्यांचं घर . कुटुंबं तसं खाऊन पिऊन सुखी असलं तरी परिस्थिती साधारण होती. बंड्याचा भाऊ त्याच्यापेक्षा जेमतेम अडीच वर्षांनी मोठा. त्यामुळे स्वाभाविकपणे लहानपणी बंड्याला दुपटी , टोपडी , खेळणी हे सगळं मोठ्या भावाचंच मिळालं. […]

क्रिकेटपटू माईक ब्रेअर्ली

त्याचा रेकॉर्ड बघाल तर त्याने ३९ कसोटी सामन्याच्या ६६ इनिंग्समध्ये २२.८८ च्या सरासरीने १४४२ धावा केल्या त्यामध्ये त्याचे एकही शतक नाही परंतु तो कप्तान म्हणून ‘ आउटस्टँडिंग ‘ होता असे म्हटले जाते. […]

संस्थेच्या समितीचे, सदस्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे अधिकार

अधिकार मिळाला तरी जबाबदारी याची जाणीव समिती, सदस्य तसेच पदाधिकारी ठेवत नाहीत आणि असहकार सुरु होतो. मनासारखे नाही झाले की, उपनिबंधक किंवा कोर्ट हे सर्वसामान्यासाठी नाही. तेथे काही होणार नाही. अनेकदा आपण चुकीच्या मार्गावर आहोत हे समजून घेण्याची मानसिकताच शिल्लक राहिलेली नसते आणि चुकीच्या मार्गाने व्यक्ती जात राहते. आपणही आपल्या संस्थेचे पदाधिकारी, सदस्य असल्यास अथवा पदाधिकारी होण्यास इच्छुक असल्यास हा लेख आपल्यासाठी आहे. कारण वेळीच आपल्याला अधिकार याची माहिती असल्याने तुम्ही योग्य मार्गावर आहात का याची माहिती मिळेल. सदर लेखात कोणाचे काय अधिकार आहेत हे आपणास समजण्यास मदत होईल. […]

1 25 26 27 28 29 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..