ब्लँक कॉल
चीफ ऑफिसरने सुरवात केली, तुम्हा सर्वांपैकी कोणाला एखाद्या बद्दल काही तक्रार असेल तर चीफ इंजिनियर किंवा कॅप्टन कडे येऊन तसे सांगावं. पण अशाप्रकारे कोणाला त्रास देऊ नये. मागील दोन दिवसापासून कॅप्टन च्या केबिन मध्ये रोज रात्री कोणत्याही वेळेला फोन करत आहे. रात्री बारा वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत तीन चार वेळेला कोणत्याही वेळी ब्लँक कॉल करून कॅप्टनची झोपमोड केली जातेय. […]