‘चिंटू’ या चित्रमालिकेचे निर्माते प्रभाकर वाडेकर
हरहुन्नरी कलावंत आणि घराघरात पोहोचलेल्या ‘चिंटू’ या चित्रमालिकेचे निर्माते प्रभाकर वाडेकर यांचा जन्म ८ ऑगस्ट १९५६ रोजी झाला. प्रभाकर वाडेकर यांचे शिक्षण नू. म. वि. प्रशाला आणि बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय येथे झाले. शालेय वयापासून नाटकात काम करणाऱ्या प्रभाकर यांनी महाविद्यालयीन दशेत काळाच्या पुढची नाटके रंगमंचावर सादर करून पुरुषोत्तम करंडक स्पर्धा गाजविली. ‘अर्थ काय बेंबीच्या विश्वचक्री’, ‘मंथन’ […]