पंगती-प्रपंच
संध्याकाळच्या सुमारास गाईम्हसरं डोंगरातून चरुन आल्यावर, जेवणाची पंगत बसायची. गावातील गुरवाकडून हिरव्या मोठ्या पानांपासून तयार केलेल्या पत्रावळ्या आणि द्रोण आणल्या जायच्या. गावातील चव्हाट्याच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला लांबलचक ओळीने बाप्या माणसं व त्यांच्याबरोबरची चिलीपिली मुलं, पाण्यासाठी बरोबर आणलेला तांब्या घेऊन जमिनीवर बसायची. […]