मैत्रसुखदा
मैत्र एकमेव ऋणानुबंधी नाते […]
मैत्र एकमेव ऋणानुबंधी नाते […]
१९६८ मध्ये परत तो अँशेस साठी परत सिलेक्ट झाला तो इंग्लंडच्या संघाविरुद्ध त्यावेळी ऑस्ट्रेलिया इंग्लंडच्या टूरवर गेली होते तेथे त्याने ३४.६६ च्या सरासरीने १२ विकेट्स घेतल्या. १९६९-७०मध्ये त्याच्या हाताची किंमत इतकी वाढली की त्याचा हाताचा १०, ००० ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा विमा काढण्यात आला. […]
हिंदू धर्मामध्ये ईश्वराची पूजा-अर्चना करणाऱ्या अनेक पद्धती आपण बघतो. खूप भक्ती-भावनेने त्या केल्या जातात. त्यातलीच एक पद्धत म्हणजे पंचामृताने ईश्वराला स्नान घालणे. दूध, दही, तूप, मध, साखर ह्या सर्वांनी त्याला स्नान घातले जाते व त्याचबरोबर आपली भावना अर्पित केली जाते. ह्या भावनांचा तसेच आपला नमस्कार स्वीकारावा हा त्या मागचा उद्देश्य. […]
पुढचे दहा दिवस आनंदाचे, चैतन्याचे, मोठमोठ्याने आरती म्हणण्याचे, मोदक आणि खिरापतीवर ताव मारण्याचे ! आज सकाळी झाडावरून ओंजळीत काढलेली फुले घरात नेताना त्यांतील दोन फुले अचानक जमिनीवर सांडली. गेल्या दोन वर्षात अनेक जिवलग त्या फुलांसारखे हातातून निसटले. “उरलेल्या” फुलांनिशी हा सण साजरा करायचा आहे. […]
लाँच चुकली म्हणून आम्हाला आणायला आलेल्या शिडाच्या होडीतील नावाड्याने पैसे घेण्यासाठी नकार दिला पण बाबांनी त्याला पाचशे रुपये घ्यायलाच लावले. पाचशे रुपयात आलेल्या त्या स्पेशल सेल बोट चा त्यावेळचा प्रवास हा आयुष्यातील पहिलाच प्रवास होता आणि अजूनही तो एकमेवच आणि कधीही न विसरता येण्यासारखा आहे […]
जर प्रत्येकानं असा छंद बाळगला तरी हजारो कुटुंबांच्या भाकरीची सोय होईल … अकलूज गावचा एक माणूस गेली ३० ते ३५ वर्षे सीताफळांच्या बिया साठवतो. मुंबईला, पुण्याला कामानिमित्त जावं लागतं. तो पिशवी भरून त्या घेतो आणि जाताना घाटात गाडी थांबते तिथं तिथं दरीत फेकून देतो. हल्ली त्या घाटावर पाट्यांमध्ये पिकलेली सीताफळं घेऊन अनेकजण विक्रीला बसलेले असतात. अलीकडे […]
साधारणपणे वीस बावीस वर्षांपूर्वी विजय लहान असताना दर रविवारी आम्ही तिघेही मंडईला जायचो. शनिपारच्या बसस्टाॅपवर उतरलं की, रस्ता ओलांडायचा व पलीकडे जनता सहकारी बँकेकडून कडेकडेने चालू लागायचं. वाटेत गोविंद दाजी जोशी आणि कंपनी यांचे लकडे सुगंधी हे दुकान लागायचं. उदबत्ती, चंदन, कापूर, धूप यांचा संमिश्र वास नाकात शिरायचा. त्याच्यापुढे गेलं की, कोपऱ्यावर मुरलीधर रसवंती गृह. बाहेर […]
राक्षसी महत्वाकांक्षा ‘ ह्या नाटकासाठी गोव्यात मुद्दाम दत्तोबा भोसले यांना आणले. ते केशवराव भोसले यांचे बंधू होते. त्यावेळी ‘ कंदन ‘ ची भूमिका मामांना आयत्या वेळी करावी लागली. मामांचे काम पाहून दत्तोबा भोसले इतके खूष झाले की त्यांनी मामांना आनंदाने खांद्यावर घेऊन रंगपटात नेले . […]
आजकाल इंटरनेट चा जमाना असल्यामुळे सातत्य हे व्यायाम, प्रत्यक्ष गप्पा, मैदानी खेळ या पेक्षा वेब सिरीज, पब जी सारखे बसून लढायचे खेळ, फेबु वरच्या वैचारिक गप्पा आणि टीका टोचणी यात जास्त आले आहे. […]
पार्वती व शंकर यांच्या स्तुतीपर असलेले हे स्तोत्र बहुतांश उपेंद्रवज्रा/इंद्रवज्रा वृत्तात रचलेले असून अत्यंत रसाळ व तितकेच समजण्यास सोपे आहे. त्याच्या पहिल्याच श्लोकातील ‘नगेंद्रकन्या’ या उल्लेखाने कालिदासाच्या कुमारसंभवातील पहिल्या सर्गातील ‘उमा’ या शब्दाच्या उपपत्तीची आठवण झाल्याखेरीज रहात नाही. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions