नवीन लेखन...

‘ताज हॉटेल’ ची कथा

१६ ऑक्टोबर १९०३ रोजी अरबी समुद्राच्या साक्षीने पहिले हॉटेल ताज मुंबापुरीत उभे राहिले. काही ब्रॅण्ड स्वप्न असतात. केवळ ब्रॅण्डकर्त्यांचं नाही तर वापरकर्त्यांचंही. अमुक ब्रॅण्ड एकदा तरी वापरता यावा यासाठी काही जण प्रयत्नशील असतात; पण ब्रॅण्डनेम इतकं मोठं, की त्यातले केवळ मोजकेच यशस्वी होतात. भारतीय हॉटेल समूहातील असा स्वप्नवत ब्रॅण्ड म्हणजे ताज. जे कामानिमित्त वा स्वखर्चाने इथे […]

जागतिक भूलतज्ज्ञ दिन

विल्यम मोर्टन नावाच्या दंतचिकित्सकाने अमेरिकेतील बोस्टन येथे ‘ईथर’चा वापर करून, सर्वप्रथम भूलचे प्रात्यक्षिक केले होते. त्या काळी शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांना प्रचंड वेदना होत असत, पण या प्रात्यक्षिकादरम्यान रुग्णाला वेदना झाल्या नाहीत. संपूर्ण शस्त्रक्रिया निर्वेध पार पडली. या प्रसंगाने वैद्यकीय विश्वात प्रचंड खळबळ उडवून दिली. […]

महेश माहात्म्य…

पस्तीस वर्षांपूर्वी ऑफिसवर आलेला पोरगेला महेश, आज ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमानपासून माधुरी दीक्षितपर्यंतच्या असंख्य सेलेब्रिटीजना रंगमंचावर आणणारा स्वतःच एक ‘सेलिब्रिटी’ झालेला आहे. […]

यस्. दत्तू

या कारागिरीमागे दत्तूचं एक कसब होतं. त्याला माणसाच्या डोक्याच्या घेरावरुन शरीरयष्टीचा परफेक्ट अंदाज होता.. त्या व्यक्तीला प्रत्यक्ष पाहून, त्याची शरीरयष्टी स्मरणात ठेवून, तो कपड्याचं कटींग करायचा व मुलं शिवणकाम करायची. स्त्रियांच्या खांद्यावरील मापावरुन तो गळा, छाती व बाहीचं माप लक्षात ठेवायचा.. ती भूमिका डोळ्यासमोर आणून त्या त्या व्यक्तींचे कपडे त्यानं बिनचूक शिवून दिले.. पणशीकर खूष झाले, त्यांनी आवर्जून चारूकाकांचे आभार मानले. […]

धारधार तरी उगाच चालुनी जाते (सुमंत उवाच – ५५)

पूर्वीच्या काळी रणांगणावर आपले कर्तृत्व दाखवायला अनेक प्रकारची शस्त्रे असायची. तलवार, भाला, धनुष्यबाण इत्यादी पण जसा काळ बदलत गेला तशी शस्त्रे सुद्धा अपग्रेड होत गेली. […]

प्रतिभा – व्हिन्सेंट व्हॅन गॉगची – भाग १

ॲम्स्टरडॅममधील जगप्रसिद्ध भव्यदिव्य असे ‘व्हिन्सेंट व्हॅन  गॉग’ म्युझियम हे व्हॅनगॉगच्या चित्रकला प्रदर्शनाचे सर्वात  मोठे म्युझियम होय. या म्युझियम मध्ये 200 पेक्षा अधिक रंगवलेली चित्रे, पेंटिंग्स, पाचशे चित्रे ,चार स्केच बुक्स,  तसेच व्हॅन गॉगच्या अक्षरात लिहिलेली सातशे पत्रे आहेत.  कलाकाराची कला कशी  प्रगल्भ आणि सुंदर होत जाते याचा उत्कृष्ट नमुनाच बघायला मिळतो . […]

टाटाचे कराचीहून मुंबईला पहीले हवाई मेल विमान उड्डाण

१५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटांच्या विमानाने कराचीहून मुंबईला पहीले हवाई मेल उड्डाण केले. एअर इंडियाची स्थापना १९३२ मध्ये टाटा एअर सर्व्हिसेस या नावाने झाली होती, भारतीय व्यावसायिक जे आर डी टाटा यांनी ही विमान सेवा सुरू केली होती. एप्रिल १९३२ मध्ये टाटा यांनी इंपिरियल एअरवेज साठी मेल घेऊन जाण्याचा करार मिळवला. यानंतर टाटा सन्सने दोन सिंगल […]

जागतिक विद्यार्थी दिन

भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले एपीजे अब्दुल कलाम यांचा २०१० मध्ये संयुक्त राष्ट्राने त्यांचा सन्मान करत त्यांचा ७९ वा वाढदिवस हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून जाहीर केला होता. […]

कोटा फॅक्टरी – तारुण्याचे हडप्पा, शिक्षणाचे मोहेंजोदरो ! – ३

पुण्यातील एकेकाळच्या प्रसिद्ध “अमृततुल्य ची जागा जशी ” सायबा,येवले “अशा चेन्सने घेतली तसे आमच्या शिकवणी वर्गांच्या जागी कोचिंग क्लासेस आले. महाराष्ट्रात “चाटे ” निघाले सर्वप्रथम या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर पाऊल टाकणारे आणि त्यानंतर आता गल्लीबोळात त्यांच्या आवृत्त्या आहेत. […]

1 15 16 17 18 19 30
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..