ड्रीम होम
बाबा रिटायर व्हायच्या पूर्वीच गावातील आमच्या जुन्या घराचे नूतनीकरण केले होते. गावातील आमचे दुमजली घर एखाद्या वाड्या सारखेच मोठे होते. घरातील वरचा माळा लाकडाच्या फळ्यांनी आणि त्याच्यावर आणखीन एक पोटमाळा. घराचे छप्पर अजूनही कौलारु आहे. साठ पासष्ट वर्ष होऊनही आमच्या त्या घराच्या भिंतीत खिळा ठोकता येत नाही एवढे मजबूत बांधकाम आजोबांनी करून घेतले होते. […]