ज्येष्ठ अभिनेत्री लता शिलेदार उर्फ दीप्ती भोगले
संगीत रंगभूमीवर नायकाच्या भूमिका गाजवणाऱ्या मोजक्या अभिनेत्री मध्ये दीप्ती भोगले यांचे नाव वरती आहे. त्यांच्या कृष्ण, धेर्यधर या भूमिका खूपच गाजल्या होत्या. दीप्ती भोगले यांनी संगीत रंगभूमीवर स्त्री भूमिके पासून पुरुष भूमिके पर्यत आपले स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले. […]