नवीन लेखन...

मुक्त

झुगारून द्यावीत बंधने स्वतःची मनाची, तनाची नि बांधल्या बंधांची, अदृश्य बेड्यांची नि भावनिक गुंत्यांची! ओलांडून यावेत उंबरठे लोकलाजेचे मान नसलेल्या दाराचे नि नासलेल्या शेवाळी नात्यांचे! उधळून लावाव्यात शेजा रत्नमाणकांच्या हवा कशाला मोह त्या सोन्याच्या पिंजऱ्याचा पारतंत्र्यात हरवतात जाणिवा किमान जगण्याच्या! पेटवून द्यावेत लोळ तप्त आगीचे वडवानलाचे नि धगधगत्या निखाऱ्यांचे ओतावे स्वत्व त्यात बनण्या कणखर लोहाचे! तुडवावी […]

वठलेल्या वडाला मोह

वठलेल्या वडाला मोह आम्रतरुचा झाला आहे काष्ठवत फांद्यांवर पर्ण पिसारा फुलून आहे.. मनातील सारे न कळून आहे प्रेमाच्या सावलीत भाव रडून आहे दुःखाच्या मागे व्यथा निःशब्द आहे वठलेला वड आज फकीर आहे.. न कळत्या दुःखाना वेदनेची अस्पष्ट करुण किनार आहे मरणाची वाट जवळ येईल कधीही अंतरात दुःख विरजून अनामिक आहे.. आम्रतरुचा झोका मदमस्त एकाकी वड उन्मळून […]

खरी संक्रात

आज संक्रातीचा गोड सण शुभेच्छांसाठी आला ताईचा फोन सांगे खुशाली अन मोकळे करे मन जिवाभावाच्या गोडव्याचा सण आज संक्रातीचा गोड सण सांगे ती केलीत घरी, किती पंचपक्वान्न सुग्रास ताटभरुन आहे इथे अन्न सोबतीला आहे पुरण नि वरण आज संक्रातीचा गोड सण विचारे आता खुशाली भाच्याला पण सांग म्हणे काय छान जेवलास जेवण केलेस का नवे कपडे, […]

पूर्णविराम

भूतकाळात झालेल्या गोष्टींना पूर्णविराम देण्याशिवाय आपल्याकडे दूसरा कोणताही पर्याय नाही. जर आयुष्याला नवे वळण द्यायचे असेल तर वाईट गोष्टींना, घटनांना विराम द्यावा. कारण आयुष्य हे ऊन पावसा सारखे आहे. सुख-दुःख ह्यांचा खेळ चालूच राहणार. पण नवीन दृश्य आपल्याला बघायची असतील तर नकारात्मक विचारांना विराम देऊन, विचारांना नवीन बनवण्याची गरज आहे. […]

‘दामू, साने गुरुजींचा धडपडणारा मुलगा’ – पुस्तक परिचय

हे पुस्तक आशाताई कुलकर्णी यांनी २०१८  मध्येच मला सप्रेम भेट म्हणून दिले होते. त्यावेळी मी ते पुस्तक वाचून काढले होते, पण पंधरा दिवसांपूर्वी ते पुस्तक मी वाचू लागले आणि त्यातला सखोल आणि सुयोग्य अर्थ, खरेपणा मला जाणवू  लागला. हा धडपडणारा विद्यार्थी म्हणजे, तरुण वयातच भारावून जाऊन, देश आणि लोक सेवाकार्यात झोकून देणारा ‘दामोदर बळवंत कुलकर्णी”,  म्हणजेच साने गुरुजींचा दामू !  ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’  हा त्यांचा सामाजिक कार्याचा गाभाच आणि मूलतत्वच  होते. […]

जेष्ठ नेते वसंतदादा पाटील

वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण सुमारे ४ वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. त्या आधी १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते. […]

राजकीय पुढारी मुकुंद जयकर

वयाच्या चोविसाव्या वर्षी इंग्लंडला जाऊन ते बॅरिस्टर झाले आणि मुंबई उच्च न्यायालयात कायदेपटू म्हणून प्रसिद्धीस आले. १९१९ साली पंजाबमध्ये झालेल्या हत्याकांडाची चौकशी करण्याकरता काँग्रेसने जी एक समिती नेमली होती, तिचे ते सदस्य होते. […]

1 20 21 22 23 24 36
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..