‘कोशिश’ – शब्देविणू संवादू !
“कोशिश” हा हिंदी नव्हें तर भारतीय चित्रसृष्टीतील मैलाचा दगड आहे. हा एकच चित्रपट करून गुलजार ,संजीवकुमार ,जया भादुरी आणि असरानी थांबले असते तरी चिरकाल आपल्या स्मरणात राहिले असते .नाही म्हणायला आपले प्रेक्षक म्हणून अपरिमित नुकसान झाले असते हा भाग अलाहिदा . कारण कोशिश नंतरही त्यांनी आपल्याला एकाहून एक नजराणे बहाल करून श्रीमंत करून टाकलेले आहे. […]