तू
कधी तू तळपत्या तलवारीची तीक्ष्ण धार कधी तू मृदू आणि कोमल बहावा अलवार कधी तू वज्राहून कठीण माळावरचा कातळ कधी तू बेफाम फुललेला गर्दगुलाबी कमळ कधी तू मर्द मराठी गडी रांगडा कधी तू न सांगता समजणारा मनकवडा कधी तू रुक्ष नि बोचरा निवडुंग कधी तू वेडावणारा चाफ्याचा सुगंध कधी तू तांडवाचा रुद्र अंगार कधी तू बेधुंद […]