या मनाचे त्या मनाला
या मनाचे त्या मनाला शब्द सारे भाव उलगडते काव्यांत जीव व्याकुळ कवितेचे लेणे कवीला लाभाते.. या हृदयाचे त्या हृदयाला शब्द सारे बंदिस्त होते बहरतो कवी कवितेत आल्हाद कवीचे मन वेगळे जरा असते.. या अंतरीचे त्या अंतराला शब्दसाज कवितेत गुंफून राहते मरेल कवी या दुनियेतून जरी कवीच्या कवितेचे नक्षत्र अमर होते.. — स्वाती ठोंबरे.