जन्म मानवी
दु:खांना सहजी झेलित झेलित मी सुखांना कुरवाळीत राहिलो सहवासातील क्षण सारेच सुंगंधी सुखानंदा नित्य उधळीत राहिलो।।१।। उलघाल जरी अंतरी संवेदनांची विवेके, संयमी सुखात राहिलो दान! जीवनी सारेच दयाघनाचे प्रारब्धा, उमजुनी जगत राहिलो।।२।। अनंत जन्मातुनी हा जन्म मानवी सुसंस्कारी सत्कर्म करीत राहिलो मनामनांनाच जगती सांधित जावे भावना! हीच उरी जपत राहिलो।।३।। जीव! हा नकळत जातो सोडुनी सत्य! […]