सेनानी महाराणी ताराराणी
महाराणी ताराबाई या छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यांच्या कन्या होत्या. त्यांचा जन्म १६७५ रोजी झाला. छत्रपती राजाराम महाराजांशी त्यांचे लग्न १६८३-८४ च्या सुमारास झाले. २५ मार्च १६८९ रोजी मोघलांनी रायगडांस वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या.छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई,राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या.रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली […]