नवीन लेखन...

कोणार्क सूर्य मंदिर

खरेच कोणार्क काय , खजुराहो काय आज ना उद्या हे भिकार लोक नष्ट करण्याच्या मागे लागतील ते धर्माच्या नावावर आणि कचकड्याच्या भावनेच्या जोरावर अशा या ‘ पंड्याना ‘ आताच आवरले पाहिजे. आणि हो कोणार्क आणि खजुराहो पाहूनच घ्या हे इतिहासाचे मारेकरी काहीही करतील ? […]

अभिनेते शरद तळवलकर

शरद तळवलकर यांना स्टेजवर अभिनय करताना पाहणे म्हणजे पर्वणीच असे . त्यांच्या ‘ अप्पाजींची सेक्रेटरी ‘ या नाटकात तर त्यांनी इतकी धमाल केली होती की त्यांनी जे नाटक पाहिले आहे तो ते नाटक कधीच विसरू शकणार नाही. जवळजवळ ६० वर्षे ते अभिनय करत होते. […]

आवरणे कसले, कधी (सुमंत उवाच – ८६)

माणूस कितीही मोठा असला, प्रसिद्ध असला, कर्माने उंची गाठलेला असला तरी तो स्वतःला अधीर क्षणी, संकट काळी, अतीव दुःखाच्या क्षणी, अत्यंत आनंदाच्या वेळी आवरू शकेलंच असे नाही. […]

‘बिनाका गीतमाला’ ची सुरुवात

एके काळी याच अमीन सयानीनी ‘आवाजकी दुनियाके दोस्तो’ अशी स्नेहपूर्ण साद घालून रसिकांच्या मनावर आणि हृदयावर ‘बिनाका गीतमाला’ या प्रचंड लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक वर्ष राज्य गाजवलं होत. […]

माणसांची अलोट गर्दी

माणसांची अलोट गर्दी अनोळख्या ओळखी, आयुष्याच्या पटावरी भेटतील माणसं वेगवेगळी.. कोण कुठे कसा राहतो दूर दूर असतील घरटी, बंध जुळतात जेव्हा ओळख होईल तेव्हा थोडी.. कुठे जास्त कुठे कमी माणसं आयुष्यात येती, नियतीचे सूत्र सारे अनामिक कुणी जवळ कुणी दूर जाती.. आयुष्याच्या पटावरी जमा खर्च आलेख होई, प्रारब्ध न चुके कुणाला कोण कधी जीवनात येई.. जीवन […]

आधी त्याचे जग

आधी त्याचे जग आणि तिचे जग एकच होते, नंतर मात्र संसारात हे जग कधी विभागले हे दोघांनाही कळले नाही थोडा दुरावा झाला परंतु चांगलेच झाले एकमेकांचे ‘ प्रेम ‘ मार्गी लागले खऱ्या प्रेमांत असेच असते…आधी ते अव्यक्त असते.. मग ते व्यक्त होते आणि मग परत अव्यक्ततेकडे प्रवास सुरु होतो काही समजले का लेको…. — सतीश चाफेकर.

संयुक्त अरब अमिरातीचा ५० वा राष्ट्रीय दिवस

२ डिसेंबर १९७१ या दिवशी, संयुक्त अरब अमिराती ची स्थापना करण्यात आली व अबु धाबी, दुबई, शारजा, अजमान, उम अल-कुवैन, रस अल-खैमा व फुजैरा या सात अमिरातींनी संयुक्त अरब अमिराती या नावाने एक संघराज्य बनवले. […]

होते पहाट आल्हाद गारवा

होते पहाट आल्हाद गारवा झेडीतो हलकेच शिरशिरी मारवा, प्राजक्त उमलतो हलकेच असा अंगणी बहरुन गंधित सडा.. उगवतो रवी केशरी प्रभा रंग बावरे किरमिजी आभा, उगवत्या रवीस उषेची साथ जरा दवबिंदूची दाटी पानोपानी थेंब सजता.. किलबिल पक्षी थवा आकाशी जसा माळ एका लयीत फिरफिरती पाखरे पुन्हा, सजले आकाश सजली नटून धरा थबकले मन परतुनी वळणावर पुन्हा या.. […]

कधी कधी दूरवरून चांगले दिसते

कधी कधी दूरवरून चांगले दिसते असे म्हणतात …पण प्रेमात मात्र कधीकधी तसे नसते, दूरचे जेव्हा जवळ येते तेव्हा खूपच चागले भासते.. आत्ता भासणे आणि असणे यातील फरक ज्याचा त्यानेच शोधायचा असतो…. पण शक्यतो शोध घेण्याच्या फंदात पडू नये कारण… हा शोध पुढे अपघात ठरू शकतो… — सतीश चाफेकर.

क्लासिकल कॉन्सर्ट

मल्टिप्लेक्सप्रमाणे किंवा नाट्यगृहांप्रमाणे इथेही भ्रमणध्वनी अधून-मधून तपासणारे श्रोते होते. काहीजण फोटोत छवी टिपण्यात किंवा व्हिडीओ काढण्यात दंग होते. समोरचे “ताजे ” सुरेल क्षण जपण्या ऐवजी त्यांना ते भविष्यासाठी कुपीत ठेवायचे असावेत. याचा काहीसा त्रास जरूर होतो पण सगळेच निमंत्रित ! त्यातल्या त्यात माझ्या शेजारी बसलेल्या रसिक स्त्रीने फक्त ऑडिओ रेकॉर्डिंग केले त्यामुळे कोणाचे लक्ष फारसे विचलित झाले नाही. हाईट म्हणजे एक-दोन श्रोते फारच दाद देत होते माना हलवून ! […]

1 41 42 43 44 45
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..