आनंद सोहळा
माहोल हा प्रसन्नतेचा तृप्त! कृतार्थ लोचने आभाळ सप्तरंगलेले ब्रह्माण्ड! सारे देखणे। मनांतरी, मीरा! राधा! कृष्ण! कृष्ण! अंतरी हृदयांतरी, माधुर्यभक्ती मंत्रमुग्ध! नाद सुस्वरी। निरभ्र! या निलांबरी लपंडाव, भास्कराचा साक्षी! लोभस निसर्ग खेळ हाच दयाघनाचा। रूप! निरागस निर्मल भाव! मधुरम मधुरम नेत्री कनवाळू कैवल्य मुक्ती मोक्षाचा सागर। सांजआभाळ, तुष्टलेले मेघ आठवांचेच लोचनी भास! सोज्ज्वळ हृदयी ब्रह्मानंदी सोहळा जीवनी। […]