निवद
चेरोबा आणि पारदेवाच्या चौथऱ्यासारखे बांधकाम केलेले आहे. पण आमच्या शेतांच्या जवळ असलेला म्हसोबा देव बांधावरच आहे. मूर्ती नसलेले आणि शेंदूर फासलेले दगड हेच आमचे गावदेव आहेत. गावात सगळ्यात जास्त चेरोबा देवाला मानतात. म्हसोबा देवाला तिथं आसपास ज्यांची शेती आहे ते लोकं जास्त मानतात. ह्या गावदेवांना गावातली लोकं वर्षातून एकदा तरी कोंबड्याचा निवद म्हणजे नैवेद्य देत असतात. […]