संस्थेतील पदाधिकारी हे अनेकदा स्व:ताहून संस्थेचे काम करण्यास पुढे आलेले नसतात. संस्थेचे काम करण्यास सभासद हे उत्साही नसतात. सभासद दुसऱ्यावर आरोप करण्यास नेहमी तत्पर. अनेकदा सदस्याचे म्हणणे असते की, काय काम असते हेच माहित नाही, कोणी सांगितले आहे लष्कराच्या भाकऱ्या भाजायला जायचे आणि स्व:ताचे हसे करून घ्यायचे. पदाधिकारी यांची संस्थेतील कार्य, अधिकार आणि जबाबदारी आपल्यासाठी लेखातून देणार आहे. आजच्या लेखात अध्यक्ष याबाबत माहिती आपल्यासाठी उपयोगी असू शकते. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची निवड दर पाच वर्षाने होते. सभासदामधून निवडून आलेल्या व्यवस्थापन समिती सदस्यामधून एका संचालकाची निवड अध्यक्ष म्हणून पहिल्या सभेत करण्यात येते. अध्यक्ष हा संस्थेच्या सर्व साधारण सभा व व्यवस्थापन समितीच्या सभांचा पदसिद्ध अध्यक्ष असतो व तो नेहमी संचालक मंडळाला जबाबदार असतो. […]