नवीन लेखन...

‘वो शाम कुछ… ‘

हळवेपण ही भावना साधारण स्त्रियांशी संलग्न असते. पण ठरविले तर एखादा पुरुष उत्कट हळवा होऊ शकतो याचा थरार आणणारा अनुभव किशोर देतो ” वो शाम कुछ अजीब थी ” या ओळींना जिवंत करून ! […]

निवांत

आताशा वाटतं बसावं इथंच निवांत क्षणांचे शिंपले वेचत आणि पहावं दूर मागे त्या वाटांकडे जिथून आले होते ते सुखदुःखांचे वारे.. आयुष्याचं गणित मांडून सोडून द्यावेत जुने हिशोब आणि बसावं इथंच निवांत स्वप्नांचा कशिदा विणत… — आनंद पाटणकर

चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग

चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचा जन्म ५ ऑगस्ट १९३० रोजी झाला. अंतराळवीर बनण्याआधी नील आर्मस्ट्राँग नौदलात होते आणि त्या वेळी त्यांनी कोरिया युद्धात भाग घेतला होता. ते एअरोस्पेस इंजिनीअर, नौदल अधिकारी, टेस्ट पायलट आणि प्राध्यापकदेखील होते. नौसेनेतील नोकरीनंतर आर्मस्ट्राँग यांनी पुरूडू विद्यापीठातून पदवी घेतली आणि त्यानंतर एका ड्रायडेन फ्लाईट रिसर्च सेंटरमध्ये दाखल झाले. तेथे […]

मुगल ए आझम

मुगलएआझम या चित्रपटाचा शुभारंभ ५ ऑगस्ट १९६० रोजी मुंबईतील ‘मराठा मंदिर’ या चित्रपटगृहात झाला. आगाऊ तिकीट मिळविण्यासाठी एक लाखाहून अधिक मंडळी चित्रपटगृहाबाहेर जमली होती. उच्चभ्रू प्रतिष्ठितांना राजांच्या खलित्यासारखे, उर्दू निमंत्रण – फर्मान धाडण्यात आले होते. चित्रपटाची सर्व रिळे हत्तीच्या पाठीवरून चित्रपटगृहात आणण्यात आली. चित्रपटगृहाबाहेर शीशमहालचा सेट आणून पुन्हा उभारण्यात आला होता. मुगल-ए-आझम बनवण्यासाठी के.असिफ यांना असंख्य […]

ज्येष्ठ गायिका आणि संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे

ज्येष्ठ गायिका आणि संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचा जन्म ११ मे १९१४ रोजी गोव्यातील बांदिवडे गावी झाला. आपल्या अथक परिश्रमांच्या बळावर ज्यांनी ‘स्वरज्योत्स्ना’ असं नावं मिळवलं. त्या गायला लागल्या, की वाद्यं आपोआप झंकारायला लागत, असं म्हटलं जात असे. गायिका म्हणूनच नव्हे, तर अभिनेत्री म्हणूनही नाव कमावलेल्या जुन्या पिढीतील कलावंत ज्योत्स्ना भोळे. ज्योत्स्ना भोळे यांना अभिनया प्रमाणे आवाजाची […]

हम आपके है कौन

‘हम आपके है कौन’ हा चित्रपट ५ ऑगस्ट १९९४ रोजी रिलीझ झाला. काही काही चित्रपट काळ कितीही पुढे सरकला तरी ते ‘कालचे ‘ होत नाहीत. ते कायमच ‘आजचे ‘ राहतात. राजश्री प्रॉडक्शनच्या सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन ‘ या कौटुंबिक चित्रपटाबाबत अगदी तसेच झाले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनास आज यशस्वी २७ वर्षे पूर्ण होत […]

क्रिकेटपटू चेतन चौहान

चेतन चौहान यांनी पुणे विद्यापीठासाठी रोहिंग्टन बात्रा ट्रॉफीसाठी क्रिकेट खेळले , आणि त्याच सीझनमध्ये त्यांची निवड वेस्ट झोनसाठी झाली ती विझी ट्रॉफीसाठी. […]

मुंबई – जकार्ता व्हाया दुबई

मुंबईवरून आलेले आमचे फ्लाईट लँड झाल्याझाल्या एअरपोर्ट च्या ग्राउंड स्टाफ ची गडबड आणि विमानांची गर्दी लक्ष वेधून घेत होतं. माझा पहिलाच विमानप्रवास आणि पहिलीच परदेशवारी त्यामुळे सगळ्याच गोष्टींच अप्रूप वाटत होतं. […]

कर भला

शिवाजी रोडने मंडईकडून शनिपार मार्गे ऑफिसवर पोहोचेपर्यंत वाटेत कधी कुणी गरजू वृद्ध स्त्री-पुरुष दिसले तर, त्यांना दोन-पाच रुपये देऊन पुढे जातो. हे पैसे देऊन मी फार मोठे कार्य करतोय असं नाही, तर मला तसं केल्याने एक आत्मिक समाधान लाभतं.. […]

1 170 171 172 173 174 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..