नवीन लेखन...

घट्ट कवडी दही लावण्याची शास्त्रीय पद्धत

दही लावण्याची परंपरा आपल्याकडे शेकडो वर्षांपासून आहे. पण बरेच वेळेला दही व्यवस्थित लागत नाही. त्यात पाणी व चोथा वेगळा होतो. अशावेळी दही कसे लागते व त्यासाठी कोणत्या परिस्थती अनुकूल व प्रतिकूल असतात याची आपण शास्त्रीय माहिती घेऊ. दही लागणे हे खालील गोष्टीवर अवलूंबून असते. […]

मर्चंट नेव्ही लॉक्ड डाऊन

दोन दिवस झाल्यावर सोसायटीतील सगळ्या लोकांना मी आलीय हे समजल्यावर मला माझ्या घरातून निघून 14 दिवस दुसरीकडे सोसायटी बाहेर राहायला जाण्यासाठी मागणी करू लागले. 14 दिवसांनी टेस्ट केल्यावर कोरोना कॅरीयर नसल्याचे सिद्ध केल्यावर सोसायटीत येण्यासाठी सांगितले. त्यांच्या या मागणीवर मी त्यांना तशाप्रकरची माझ्या नावे नोटीस काढायला सांगितली परंतु तशी नोटीस देणे बेकायदेशीर असल्याने ते तावातावाने निघून गेले. […]

आयरिश नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ

महान आयरिश नाटककार, समीक्षक आणि विचारवंत जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म २६ जुलै १८५६ रोजी आयर्लंडची राजधानी डब्लिन येथे झाला. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेलं होतं. पुढे तो डब्लिनहून लंडनला स्थायिक झाला. ब्रिटिश म्युझियमच्या लायब्ररीत बसून त्याचं वाचन आणि लेखन चाले. त्याच्या सुरुवातीच्या चारही कादंबऱ्या प्रकाशकांनी नाकारल्या होत्या. वर्तमानपत्रासाठी पाठवलेले लेखही साभार […]

दिगू टिपणीस

मुख्यमंत्री जीवाजीराव शिंदे हे मंत्री मंडळाचा केलेला विस्तार पत्रकार परिषदेत सांगू लागतात, तेव्हा पत्रकार दिगू टिपणीसला मानसिक धक्का बसतो. त्याने केलेल्या कल्पनेच्या पलीकडचे प्रत्यक्षात घडताना पाहून तो तिरीमिरीत उठतो व मंत्रालयाच्या बाहेर पडतो.. रस्त्यावरील एक भिकारी त्याच्या समोर येऊन हात पसरतो.. दिगू भिकाऱ्याकडे एकटक पाहता पाहता हसू लागतो.. भिकारीही त्याच्या हसण्यात सामील होतो… आणि ‘समाप्त’ ची पाटी पडद्यावर झळकते.. […]

ज्येष्ठ वैज्ञानिक भारतरत्न सी. एन. राव

डॉ. राव हे ‘ सॉलिड स्‍टेट केमिस्‍ट्री ‘ (Solid State Chemistry) म्हणजे घन-स्थिती रसायनशास्त्र व संरचनात्मक रसायनशास्त्र हे त्यांचे अभ्यासाचे प्रमुख विषय आहेत. त्यांचे आजपर्यंत चौदाशे शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांनी एकूण ४५ पुस्तके लिहिली आहेत. […]

सुप्रसिद्ध अभिनेते मधुकर तोरडमल

शाळेत पहिल्या दिवशी ओळख करून देताना त्यांनी नाटकात काम करण्याचा छंद असल्याचे वर्गशिक्षिका जयकर बाईंना सांगितले. बाईंनी ते लक्षात ठेवून गणेशोत्सवात एका नाटकाची संपूर्ण जबाबदारी मामांवरच सोपविली. […]

सुप्रसिद्ध नाटककार बाळ कोल्हटकर

महाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळकृष्ण हरी कोल्हटकर म्हणजे बाळ कोल्हटकर हे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू होते. […]

सुएझ कॅनॉल आणि जागतिक ट्रॅफिक जॅम

इजिप्त हे जगातील पहिले साम्राज्य आहे ज्यांनी या पृथ्वीवर प्रथमतः मानवनिर्मित कॅनॉल बनवला. हा कॅनॉल मेडिटेरीनियन समुद्र आणि रेड सी (लाल समुद्र) यांना जोडतो. हाच कॅनॉल याच्या भौगोलिक स्थानामुळे पूर्व आणि पश्चिम जग जोडणारा एक दुवा मानला जातो. या कॅनॉल ची खुदाई आणि बांधकाम वेगवेगळ्या शासकांच्या काळात शेकडो वर्षे होत आले. कॅनॉल च्या उत्तर भागाला पोर्ट साईड तर दक्षिण भागाला सुएझ ही ठिकाणं आहेत. […]

जेम्स थॉमस मोल्सवर्थ आणि मराठी शब्दकोश

जेम्स थॉमस मोल्सवर्थ, ज्याची मातृभाषा इंग्रजी होती, ज्याचा मराठीशी काही संबंध नव्हता, असा एक ब्रिटीश आपल्या भाषेच्या प्रेमात पडतो काय, त्यासाठी आयुष्य वाहून टाकून शेवटपर्यंत अविवाहित राहतो काय, आणि कोण कुठले परके ब्रिटीश त्याच्याकडून १८५७ साली आपल्याला पुढे आयुष्यभर पुरेल असा सुधारित शब्दकोश तयार करुन घेतात काय, सगळेच अघटित आहे.
[…]

पाठलाग

लग्नाचा वाढदिवस संपला. पार्टी आणि पाहुणे हे सोडून ते दोघे आज एकमेकांशी काहीही वेगळं बोलले नव्हते. इतका खास दिवस पण तोही रोजच्यासारखा आला आणि गेला. सईला झोप येईना. ती हॉलमध्ये आली…. मागची सारी वर्षे आज तिच्यापुढे उभी राहिली होती. ती विचार करत किती तरी वेळ बसुन राहिली. […]

1 181 182 183 184 185 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..