मराठी चित्रपट सृष्टीतील सूर्यकांत यांनी अनेक चित्रपटातून शिवाजी राजांची अजरामर भूमिका साकारली यांच्या भूमिकेतून प्रेरणा घेऊन दक्षिणेत एन टी रामाराव ,शिवाजी गणेशन ,करुणानिधी यांनी तेथील भाषेत राजांची भूमिका साकारली या भूमिकेमुळे अफाट लोकप्रियता मिळवून दक्षिणेकडील स्टार नेते बनले . पण दुर्दैवची बाब आहे की ज्यांनी ही शिवरायची भूमिका अजरामर केली .ते सुर्यकांत मांढरे आजच्या पिढीला अज्ञात आहेत .ज्यांच्या अभिनयातून आणि त्यांच्या शरीराच्या ठेवणीतून संपूर्ण महाराष्ट्राला आपले आराध्य शिवप्रभू पाहता आले, आजही अनेक बऱ्याच ठिकाणी शिवरायांचे तैल चित्र हे सुर्यकांत यांच्या रूंपात रंगवलेले पहावयास मिळते, कारण त्यांच्या अभिनयामुळेच त्यांनी शिवराय अगदी हुबेहूब जिवंत केले आणि १९०० शतकात आपल्याला प्रत्यक्ष शिवप्रभू अनुभवता आले. […]