ज्येष्ठ अभिनेते डॉ.याकूब सईद
याकूब सईद पुण्यात शाळेत शिकत असताना दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. त्यांच्या शाळेसमोर असलेल्या ‘शालिमार फिल्म स्टुडिओ’मध्ये शाळा शिकून ते काम करत असत. संध्याकाळी काम करायचे आठ आणे किंवा रुपया मिळत असे. हे झाल्यावर रात्री ‘शिरीन’, ‘अपोलो’,’ऑडियन’, ‘कॅपिटल’ या थिएटर्सवर चित्रपटांच्या ते गाण्यांची पुस्तकं विकत असत.‘बरसात एक आणा, बरसात एक आणा’असं करता करता ते एम.ए. झाले. […]