नवीन लेखन...

अभिनेते निळू फुले

वग असो, नाटक असो वा चित्रपट – स्वत:च्या खास शैलीने त्यांनी त्या त्या भूमिका अजरामर केल्या. केवळ चेहर्‍यांच्या संयत हालचाली, डोळे, पापण्या, ओठ, गाल अशा चेहर्‍यावरच्या सूक्ष्म हालचालींमधले संथ तरीही आशयसंपन्न फरक, त्यांच्या भूमिकेतून फार मोठा परिणाम साधत असे. सामाजिक समस्यांशी आणि त्यांच्या निराकरणासाठी झटणार्‍या निळू फुले यांना सामाजिक समस्यांना तोंड फोडणारी ‘सूर्यास्त’, ‘सखाराम बाईंडर’, ‘बेबी’ यांसारखी मोजकी नाटके करायला मिळाली. पण त्यांनी सहजसुंदर अभिनयाने आणि अचूक निरीक्षणाने या नाटकातल्या भूमिकांना एका उंचीवर नेऊन ठेवले. […]

टेबल मॅनर्स

फोर्क आणि स्पून ने जेवायचे, जेवताना अन्न खाली पडून द्यायचे नाही. प्लेट मध्ये काट्या चमच्यांचा आवाज नाही झाला पाहिजे. फोर्क किंवा क्नाइफ कोणत्या हातात पकडायची वगैरे वगैरे सांगितले गेले. अर्ध्यापेक्षा जास्त जणांना हे माहिती होते आणि त्यांना तसं जेवता पण येत होते. पण माझ्यासारख्या काहीजणांना जेवताना कसले मॅनर्स पाळायचे, जहाजावर जाऊ तेव्हा बघू असं वाटायचं. घरात मांडी घालून हाताने जेवायची सवय, शेतावर लावणी नाहीतर कापणीला डाव्या हातावर भाकरी आणि त्याच भाकरीवर वाळलेले बोंबील, सुकट नाहीतर जवळ्याचे कालवण खाताना जी चव लागते ती पंचपक्वान्ने खाताना कशी काय मिळायची आणि तीसुद्धा काटे चमच्यांनी […]

ज्येष्ठ सिनेपत्रकार देवयानी चौबळ

असे म्हणतात देवयानी चौबळ या अत्यंत फटकळ सिनेपत्रकार होत्या. तिच्या जिभेच्या तडाख्यात भलेभले सापडले होते. त्या बॉलीवूड मध्ये देवी या नावाने प्रसिद्ध होत्या. खरे तर त्यांना फिल्मस्टार व्हायचं होतं. घरात सगळे पोलीसखात्यात नोकरीला. त्यांचे वडील सुप्रसिध्द वकील होते. त्यांना हिरोईन म्हणून सगळीकडे मिरवायचं होतं. दिसायलाही त्या देखणी होती. छोट्या मोठ्या सिनेमात सहज काम मिळाले असते. […]

मी तोच आहे, तू मात्र ‘बदललास’

रविवारची सुट्टी. दुपारचं जेवण झाल्यावर मी गॅलरीत खुर्ची टाकून निवांत बसलो होतो. जूनचा महिना असल्यामुळे आभाळ भरुन आलं होतं. आता थोड्याच वेळात थेंब पडायला लागतील, असं भर दुपारी ‘नभ मेघांनी आक्रमिलं’ होतं. तेवढ्यात मला कुणाचा तरी आवाज आला. होय, पाऊसच माझ्याशी बोलत होता. तो मला म्हणाला, ‘कसा आहेस मित्रा, ओळखलंस का मला?’ मी गोंधळून गेलो. मला काय बोलावं ते सुचेना. […]

दुर्गाबाई भागवत

त्यांनी संशोधनपर , समीक्षात्मक , वैचारिक , कथा , चरित्र, संपादन , अनुवाद, बालसाहित्य , ललितगद्य असे विविधअंगी लेखन केले. त्यांची सुमारे सत्तर पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. दुर्गाबाई विणकाम, भरतकाम, स्वयंपाक यामध्ये पारंगत होत्या . त्यांनी काही नव्या पाककृतीही शोधून काढल्या आहेत. दुर्गाबाईंचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले. तर हायस्कुलमधील शिक्षण अहमदनगर, नाशिक, धारवाड आणि पुणे यथे झाले. त्यांनी ‘ अर्ली बुद्धिस्ट ज्युरिस ज्यूरिसप्रूडन्स ‘ हा विषय घेऊन एम.ए केले. विद्यार्थीदशेत असताना त्यांनी महात्मा गांधींच्या चळवळीतही भाग घेतला होता. भारताच्या आद्य स्त्री-शास्त्रज्ञ कमला सोहोनी या त्यांच्या भगिनी होत्या. दुर्गाबाईचे फ्रेंच, जर्मन, संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. […]

सुप्रसिद्ध कवी अनिल

कवि अनिल यांनी १९३० च्या सुमारास काव्यलेखनास सुरवात केली. त्या काळात जबरदस्त लोकप्रिय असणाऱ्या रवीकिरण मंडळाच्या कवितेपेक्षा त्यांची कविता वेगळी असल्यामुळे लोकांना ती आवडली. त्यांची सुरवातीची कविता ऋजू , भावपूर्ण , सौम्य शब्दाच्या कलेची होती. ‘फुलवात’ या त्यांच्या पहिल्या संग्रहानंतर तीन वर्षाने आलेल्या ‘ प्रेम ‘ आणि ‘ जीवन ‘ या संग्रहात त्यांनी मुक्तछंदात दीर्घ कविता लिहिली त्यामुळे कवि अनिल मराठी मुक्तछंदात्मक कवितांचे प्रणेते समजले जातात. त्यानंतर त्यांनी कला आणि संस्कृती यांच्या परस्पर संबंधावर भाष्य करणारे ‘ भग्नमूर्ती ‘ हे खंडकाव्य लिहिले . […]

लेखिका मालतीबाई बेडेकर

मालतीबाई बेडेकर उर्फ विभावरी शिरुरकर यांची ‘ हिंदोळ्यावर ‘ ह्या कादंबरीतून वैचारिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या स्त्रीमुक्तीचा महत्वाचा टप्पा गाठला होता आणि आजही आपण किती पुरोगामी आहोत यांचा विचार करणे आवश्यक आहे. पुढे त्यांनी विभावरी शिरुरकर या नावाने विरलेले स्वप्न , बळी , बाई , दोघांचे विश्व आणि इतर कथा , शबरी ही पुस्तके लिहिली आहेत . तर रानफुले , हिंदू-व्यवहार धर्मशास्त्र , स्त्रियांच्या हक्कांची सुधारणा ही पुस्तके त्यांनी ‘ बाळूताई खरे ‘ या नावाने लिहिली. […]

ज्येष्ठ अभिनेते दारासिंग स्मृतिदिन

१०० हून अधिक चित्रपटांत दारा सिंग यांनी अभिनय केला होता. १९७८ साली दारासिंग यांना रुस्तम-ए-हिंद या किताबाने गौरवण्यात आले होते. २००३ साली ते राज्यसभेचे खासदारही झाले. […]

जागतिक कागदी पिशवी दिवस

हा दिवस साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे प्लास्टिक कचरा कमी होण्यास मदत करण्यासाठी प्लास्टिकऐवजी कागदी पिशव्या वापरण्याविषयी जनजागृती करणे. दीडशे हून अधिक वर्षे पाश्चात्य जग कागदी पिशव्या वापरत आहे आणि आपण अजूनही त्यांना मनापासून स्वीकारलं नाही. याने आपण आपलं आणि पर्यावरणाचे अपरिमित नुकसान केलं आहे. आता हा हट्ट आपण होऊन सोडून द्यायला पाहिजे आणि कापडी वा कागदी पिशवीचा वापर केला पाहिजे. […]

पानशेत धरण फुटी

पुण्याजवळील मुठा नदीच्या आंबी या उपनदीवरील पानशेत हे धरण फुटल्यामुळे पुण्यात आलेल्या पुरात सुमारे १,००,००० लोक विस्थापित झाले. नदीकाठचे तीन मजली वाडे पूर्णपणे बुडाले होते. आजही अशा इमारती पूररेषेच्या आठवणी सांभाळून आहेत. भांबावलेल्या अनेकांनी गणरायाचे पूजन करून पुन्हा प्रपंच उभारले. […]

1 195 196 197 198 199 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..