कुस्करलेली कळी – उमललेले फुल – ९
संगीताला आपल्या जीवनाचे चक्र कसे चालू करायचे हेच उमगत नव्हते. विचारांचा गुंता वाढतच चालला होता, डोळ्यासमोरून मौशु जाता जात नव्हती. एका नराधमाने त्या दोघीना खोल समुद्रात ढकलून दिले होते, आशेचा एखादा किरणही डोकविण्याची सुतराम शक्यता नव्हती. […]