सीओसी
जहाजावर मरीन इंजिनियर व्हायचे म्हणजे एक वर्षाचा प्री सी ट्रेनिंग कोर्स करून कमीत कमी सहा महिने पूर्ण करावे लागतात. सहा महिने काम केल्याशिवाय मरीन इंजिनियर किंवा जवाबदार अधिकारी होण्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा देता येत नाही. आपल्या भारतात ही परीक्षा भारत सरकारच्या समुद्र वाणिज्य विभाग म्हणजेच मर्कंटाईल मरीन डिपार्टमेंट कडून घेतली जाते. भारतात आणि विशेषकरून मुंबईतील केंद्रावर घेतली जाणारी परीक्षा जगातील इतर कोणत्याही देशांपेक्षा अवघड आणि कठीण समजली जाते. लेखी परीक्षा आणि त्याचसोबत तोंडी परीक्षा सुद्धा घेतली जाते. ज्यामध्ये अधिकारी होण्याकरिता लागणारी निर्णयक्षमता आणि कोणत्याही परिस्थितीला किंवा आव्हानाला सामोरे जायची सक्षमता तपासली जाते. म्हणूनच परीक्षा पास झाल्यावर मिळणारे सीओसी म्हणजे सर्टिफिकेट ऑफ कॉम्पेटेन्सी ज्याला सक्षमता प्रमाणपत्र असेच म्हटले जाते. […]