नवीन लेखन...

सोसायटी मध्ये खर्चाची जबाबदारी कोणाची

मागील लेखात आपण तक्रार कोणाकडे करायची ते वाचले परंतु बरेच पदाधिकारी चुकीच्या समजुतीने आपले सदस्याने स्वत: करायचे खर्च संस्थेच्या खर्चाने अथवा संस्थेचा खर्च बऱ्याचवेळा सदस्यांना करावयास लावतात. सदर लेखात याबाबत बऱ्याचदा विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे आपल्यासाठी. […]

एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट

बाळ गर्भात एका बाजूला गेल्याने बाळाने मुव्हमेन्ट करून दुसऱ्या बाजूचे अवयव दिसावे म्हणून डॉक्टर प्रशांत पाटील यांनी प्रयत्न केले. पण बाळ फिरायला तयार होईना म्हणून ते मिस्कील पणे म्हणाले की बाळ झोपा काढतय हलायला तयार नाहीये आणि त्याचक्षणी बाळाने एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर फिरावे तशी गर्भात गिरकी मारली. बाळाची पूर्ण तपासणी संपत आली असताना बाळाचा एका हाताचा पंजा सोनोग्राफी स्क्रीन वर हलताना दिसला. डॉक्टर प्रशांत पाटील यांनी लगेच बघा बाळ गर्भातुन आपले बोलणे ऐकून आता आपल्याला टाटा बाय बाय सुद्धा करत आहे असे हसून सांगितले. […]

“मन’मोहना’ऽऽ, तू राजा ‘मनोरंजना’तला”

मोहनच्या वडिलांचं, मनोहर (अण्णा) कुलकर्णी यांचं विजय थिएटरच्या तळघरात ‘मनोरंजन पब्लिसिटी’चं आॅफिस होतं. मनोहर कुलकर्णी, डॅडी लोणकर व नाना रायरीकर या तिघांनी मिळून ‘मनोरंजन’ची स्थापना केली. नाटकांसाठी थिएटर बुकींग, नेपथ्य, जाहिरात, लायसन्स अशा सर्व प्रकारच्या सेवा पुरवणारं पुण्यातील हे एकमेव ठिकाण होतं. […]

ताल से ताल मिला (मी आणि ती)

ताल से ताल मिला हे गाणे लागले होते आणि त्याच नादात घरातून भर पडलो. वळणावरच मला दिसली जणू माझीच वाट बघत होती तिला रिक्षा हवी होती. मी स्कुटरवर , म्हणालो ड्रॉप करतो. मनातच म्हणालो आधीच तू मला काही वर्षांपूर्वी ड्रॉप केले होते. […]

संवाद

कधी तरी एक शब्दतरी बोलत जावे असे वाटते […]

जनसंघ संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तेव्हाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजींशी विचार विनिमय करून श्यामा प्रसादांनी २१ ऑक्टोबर १९५१ रोजी भारतीय जनसंघाची स्थापना केली. १९५२च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांत जनसंघाने तीन जागा जिंकल्या. जन्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्यास त्यांचा ठाम विरोध होता. […]

धीरूभाई हिराचंद अंबानी स्मृतिदिन

यमनहून मायदेशी परतल्यावर १९५९ साली धीरूभाई यांनी मशीदबंदर मुंबई येथे नात्याने दूरचे मामा असलेल्या त्र्यंबकलाल चंदरजी दामाणी भागीदारी करून रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि ते मसाले आणि कापडाचा व्यवसाय करू लागले. मामा त्र्यंबकभाई हे स्लीपिंग पार्टनर होते. मुंबईला आल्यावर धीरूभाई सर्व कुटंबीयांसह भुलेश्वर येथे जिच्यात सुमारे ५०० कुटुंबे रहात होती अशा एका चाळीत राहू लागले. मोठे भाऊ रमणिकभाई यांनी १९६१ पर्यंत एडनचा धंदा आणि स्वतःची नोकरी दोन्ही सांभाळले. मग मात्र धीरूभाईंचा वाढता व्याप बघता तेही भारतात परतले आणि धीरूभाईंसह धंद्यातच रमले. […]

स्मार्ट इंजिन

आपल्या भारत सरकार तर्फे घेतली जाणारी एम ई ओ क्लास फोर म्हणजे मरीन इंजिनियर ऑफिसर क्लास फोर ही परीक्षा पास केल्यानंतर मला कंपनीने माझ्या सागरी जीवनातील दुसऱ्याच जहाजावर पाठविले. माझे दुसरे जहाज आईस क्लास तर होतेच पण त्याशिवाय या जहाजावरील इंजिन स्मार्ट इंजिन किंवा इलेक्ट्रॉनिक कंट्रोल्ड प्रकारचे होते. परीक्षा पास झाल्यावर पहिलेच जहाज असल्याने फोर्थ इंजिनियर म्हणून न पाठवता पुन्हा एकदा ज्युनियर इंजिनियर म्हणून पाठवण्यात आले होते. पण जहाज जॉईन केल्यानंतर पंधरा दिवसातच चीफ इंजिनियरकडून माझा रिपोर्ट मागवला गेला आणि दुसऱ्याच दिवशी फोर्थ इंजिनियर म्हणून प्रमोट केले गेले.
[…]

गोळी

लहानांपासून वृद्धांनाही आवडणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे गोळी. लहानपणी खाऊ म्हणून आमीष दाखवलं जातं ते याच गोळीचं. ‘तू जर शांत बसलास तर मी तुला एक गोळी देईन’ असं म्हटलं की, दंगा करणारा बबड्या हाताची घडी व तोंडावर बोट ठेऊन शांत बसतो. […]

‘गंधर्व नाटक मंडळी’चा स्थापना दिन

चित्रपटांच्या उदयाच्या कालखंडातही संगीत नाटकांचा प्रेक्षक कायम ठेवून सर्वोत्तम सादरीकरणाचे व्रत त्यांनी अखंड जोपासले. त्यामुळे, गंधर्व नाटक मंडळीचा दबदबा राज्यासह इतर भागांतही पसरला होता. नेपथ्य, सजावट, वेशभूषा, रंगभूषा, पात्रयोजना, साथीदार आणि त्यांची वाद्ये अशा संगीत नाटकासाठी पूरक स्वतंत्र विभागांच्या रचनेस गंधर्व नाटक मंडळीपासूनच सुरुवात झाली. […]

1 200 201 202 203 204 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..