संधिप्रकाशातील सावल्या…. एक नवी कोरी कथामाला…
आम्ही वृद्ध झालोत , पण टाकाऊ नाही झालोत . हा संधिप्रकाश दिसतोय ना तो आमचा ऊर्जास्रोत आहे . सूर्य मावळल्यानंतर आणि अंधार पडायच्या आधी जो प्रकाश असतो ना ,त्याला संधिप्रकाश म्हणतात . आमची सावली संधिप्रकाशातसुद्धा दिसते . ती अनुभवानं समृद्ध असते . त्या सावलीत बसून तुम्ही स्वतःचा शोध घेऊ शकाल . जीवन कसं जगायचं हे आम्हाला , आमच्या सावलीला विचारा . सकारात्मक आयुष्य मिळेल तुम्हाला . आनंदी जीवनाचे धडे गिरवायचे असतील तर संधिप्रकाशातील सावलीत बसण्याखेरीज पर्याय नाही . बघ , तूच ठरव , म्हातारीचं ऐकायचं की आपलाच हेका चालवून आपलं अस्तित्व धोक्यात घालायचं ? ” […]