अमेरिकन लेखक मारिओ पुझो यांचा स्मृतिदिन
१९५०-६० च्या दशकात पुझो यांनी एका प्रकाशनसंस्थेत लेखक/संपादक म्हणूनही काम केले. द डार्क एरिना ही त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. त्यानंतर द फॉच्र्युनेट पिलग्रिम ही दुसरी कादंबरीही गाजली. पण पुझो यांना खऱ्या अर्थाने यश मिळवून दिलं ते त्यांच्या जगप्रसिद्ध द गॉडफादर या कादंबरीने! या कादंबरीच्या १९६९ साली प्रसिद्ध झालेल्या पेपरबॅक आवृत्तीने त्यांना चार लाख दहा हजार डॉलरचे आगाऊ मानधन मिळवून दिले. याच कादंबरीवर आधारित फ्रान्सिस फोर्ड कोप्पोला यांच्या सहकार्याने बनविलेल्या, चित्रपटाला सर्वश्रेष्ठ रुपांतरित पटकथेसाठी असलेला अॅकॅडमी पुरस्कारा ने (१९७२ व १९७४ साली) सन्मानित करण्यात आले. पण त्यावर आधारित द गॉडफादर या चित्रपटानेही घवघवीत यश मिळविले. या चित्रपटाला अॅकॅडमी पुरस्काराच्या ११ विभागात नामांकन मिळाले होते. […]