नवीन लेखन...

‘प्रभात’ चा ‘रामशास्त्री प्रभुणे’ प्रदर्शित – ३० जून १९४४

आज दिनांक ३० जून. ‘प्रभात फिल्म कंपनी’ च्या ‘रामशास्त्री प्रभुणे’ या चित्रपटास प्रदर्शित होऊन ७७ वर्षं पूर्ण होऊन ७८ वे वर्ष लागलं.  […]

जाहल्या काही चुका…..

एक अत्यंत नितांत सुंदर भावना शब्दबद्ध करणं हे खूपच अवघड काम पण पाडगावकरांनी ते लीलया पार पाडले. खळेंसारख्या श्रेष्ठ संगीतकाराने आपल्या चालीने आणि संगीताने त्यात आणखी गहिरे रंग भरले. आणि लताने ती आर्तता, लीनता, अत्यंत संयमित, संतुलित आणि शांत स्निग्ध स्वरात परीपक्वपणे मांडली. या गाण्यातील शब्दाशब्दांचे विवेचन आमच्या मैत्रिणीने तितक्याच तोलामोलाने सिद्ध केले -अभिनिवेश न आणता ! […]

डायरीतील विस्कटलेली पाने – भाग पाच

असंख्य डायऱ्यांचा ढीग तिथे होता. नेहमीप्रमाणे विस्कटलेली पाने पडली होती. आश्चर्य म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची पेनं, पेन्सिली, बोरू, टाक, असंख्य रिफिल्स आणि शाईच्या दौती पण पडलेल्या होत्या. बाजूला तराजू मोडून पडला होता आणि हे सगळं एका कचरा कुंडीजवळ पडलं होतं. चमत्कारिक दृश्य दिसत होतं ते. मी सगळ्या डायऱ्या एकत्र केल्या, पानं एकत्र केली आणि वाचू लागलो. […]

रेस्क्यू

सत्तावीस वर्षीय इलेक्ट्रिक ऑफिसर डेक वर असणारी लाईट दुरुस्त करत होता उंची जास्त नसल्याने सेफ्टी बेल्ट आणि हार्नेस न लावता तो छोटयाशा शिडीवर उभा राहून काम करत होता. मेन डेकवर शिप साईड जवळची लाईट असल्याने शॉक लागल्या बरोबर त्याचा तोल गेला आणि तो समुद्रात पडला. […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३५)

उत्तम मैत्र हे भाग्याने लाभते ! खरी श्रीमंती तीच असते ! त्या बाबतीत मी भाग्यवंतच. मागील एका भागात मी ज्येष्ठ साहित्यिक गुरुवर्य प्राचार्य डॉ. द. ता.भोसले या अत्यन्त विद्यार्थीप्रिय अशा आमच्या कॉलेजच्या मराठीच्या प्राध्यापकांचा उल्लेख केला आहे. ते सध्या पंढरपूरला स्थायिक आहेत. […]

जान बचीं, लाखों गये

शहरातील गेल्या रविवारचीच घटना आहे. उच्चभ्रू सोसायटीतील एक बंगला. बंगल्यात तिघेचजण रहाणारे. ऐंशीच्या घरातील पती-पत्नी व त्यांचा केअरटेकर. रात्री साडेआठची वेळ. तीन चोर बंगल्याजवळ येऊन कानोसा घेऊ लागले. त्या केअरटेकरने किचनच्या खिडकीतून त्यांना हटकले. तरीदेखील त्यांनी आत प्रवेश केलाच. […]

नाईट ड्युटी

जहाज गल्फ मध्ये ओमान च्या किनाऱ्याजवळ अँकर टाकून उभे होते. इंजिन रूम मध्ये तापमान बेचाळीस अंश पेक्षा जास्त होते सी वॉटर टेम्परेचर वाढल्यामुळे जनरेटर चा लुब ऑइल टेम्परेचर हाय अलार्म येत होता. जहाज गल्फच्या बाहेर पडे पर्यंत गर्मीत जास्त काम काढू नका आणि करू पण नका अशी सूट चीफ इंजिनियरने सगळ्यांनाच देऊन ठेवली होती. […]

निवडणुक जाहीरनामा आणि मतदारांचा माहितीचा अधिकार

भारतीय निवडणुक आयोगाने राजकीय पक्षांशी सल्ला मसलत करून निवडणुक जाहिरनाम्यांबद्दल काही दिशानिर्देश जाहीर केले होते परंतु आयोगाने ह्या गोष्टीची नोंद घेतली नाही की मतदाराला निवडणुक जाहीरनाम्यांतील त्या आश्वासनांचे पुढे काय झाले हे जाणण्याचा अधिकार असणे आवश्यक आहे. पुढील निवडणुक होण्याआधी राजकीय पक्षाने किंवा उमेद्वाराने त्याच्या मागच्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांचे नक्की काय झाले हे उघड न केल्याने मतदार त्याच्या माहिती मिळवण्याच्या हक्कापासून वंचित राहतो व त्याची योग्य निर्णय घेण्याची क्षमता हिरावून घेतली जाते. […]

मुक्या प्राण्यांची ‘बोलकी’ सोबत

गावी जवळपासच्या घरात शेळ्या असायच्याच. त्यांची काळी कुळकुळीत दोन चार करडं (लहान पिल्लं) आपल्या आईच्या आसपास एकाच वेळी चारही पाय वरती घेऊन उड्या मारताना दिसायची. त्यांना पकडून त्यांच्या लोंबणाऱ्या, रेशमी मुलायम कानांना स्पर्श करताना आनंद मिळत असे. त्या करडांना पकडले की, शेळी डोळे मोठे करुन माझ्या ‘जगावेगळ्या’ कृतीकडे पहात रहायची. […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३४)

सातारला प्राचीन तसेच ऐतिहासिक शिवकालीन पार्श्वभूमी आहे हे सर्वश्रुत आहे. राष्ट्रसंत प.पू. रामदास स्वामी, रंगनाथ स्वामी, ब्रह्मेन्द्र स्वामी, गोपाळनाथ महाराज त्रिपुटी, गोंदवलेकर महाराज अशा अनेक संतविभूतींची साहित्य ग्रंथ संपदा लाभली आहे आणि तोच अध्यात्मिक साहित्य, कला, संस्कृतीचा देखील प्राचीन वारसा लाभला आहे हे मागील ३३ व्या भागातून प्रत्ययास येते. […]

1 207 208 209 210 211 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..