नवीन लेखन...

वन्स अपाॅन अ ‘Time’

राहुल टॉकीजला ग्रेगरी पेकचा ‘मेकॅनाज गोल्ड’ चित्रपट एकदा पाहून समाधान झालं नाही, म्हणून पुन्हा पाहिला. मग तसेच काऊबॉईजच्या पठडीतले, ‘वन्स अपॉन टाईम इन द वेस्ट’, ‘रेडसन’, ‘मॅग्निफिशियंट सेव्हन’ ‘रिव्हेंज’ असे चित्रपट पाहिले. क्लींट इस्टवुड, बड स्पेनर, स्पेन्सर ट्रेसी या त्रिकूटाचे अनेक चित्रपट पाहिले. संपूर्ण जगाला कुंग फू कराटेचे वेड लावलेल्या ब्रुस ली चा ‘एन्टर द ड्रॅगन’ राहुलमध्येच ब्लॅकने तिकीट घेऊन पाहिला. […]

व्यंकटेश माडगुळकर – हरहुन्नरी लेखक

नवकथा लेखकामध्ये ज्यांनी पन्नाशीच्या दशकात मराठी कथेला वेगळ वळण दिलं त्या लेखकांच्या नामावलीत व्यंकटेश माडगुळकर याचं नाव अग्रस्थानी आहे. किंबहुना ना.सी. फडके यांच्या चाकोरीबद्ध प्रेमाच्या  आणि वि.स.खांडेकर यांच्या ध्येयवादी नायकांच्या कथांमध्ये अडकलेल्या मराठी कथेला वेगळ रूप दिलं. मराठी कथेला सामान्याची कथा बनवली […]

खूप जुने मित्र

मी आणि ती खूप जुने मित्र आहोत. खूप काही बोलतो, मी भडकतो कधी कधी पण ते तितकेच असते. आज कधी नव्हे तो वर्षा दीड वर्षाने बीअर पीत हॉटेलमध्ये बसलो होतो.. […]

शिल्पकार विनायक पांडुरंग ऊर्फ नानासाहेब करमरकर

करमरकर यांची कलाकृती बघायच्या असतील तर अलिबागजवळच्या सासवणे गावातील ‘करमरकर शिल्पालया’ला नक्की भेट द्या. सत्तरहून अधिक वर्ष जुन्या घरातच शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचं हे शिल्प संग्रहालय आहे. विविध व्यक्तींचे पुतळे, शेतकरी, कोळीण, कुत्रा, म्हैस असे खूप पुतळे हे त्यांच्या अंगणात प्रवेश करताच दिसू लागतात. आतमध्ये जवळ जवळ २०० हून अधिक लहान-मोठी शिल्पं पाहायला मिळतात. सगळी शिल्पं पाहून त्यांच्या कलेला दाद द्यावीशी वाटते. […]

बाबाराव दामोदर सावरकर

बाबाराव यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान आहे. बाबाराव सावरकर हे स्वा.विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू. त्यांनीच स्वा. सावरकरांना पितृतुल्य प्रेम देऊन, अत्यंत हालअपेष्टा सोसून लहानाचे मोठे केले आणि त्यांच्या बरोबरीने क्रांतीकार्यातही भाग घेतला. […]

ताण – तणावांचे विषाणू

ताण -तणाव हे आपले पूर्वापार साथीदार आहेत. पिढ्यानपिढ्या ही भावना आपली सांगाती आहे. त्यांच्याशी जसे जमेल तसे जुळवून घेणे हळूहळू अंगवळणी पडते आहे. मात्र ताण -तणाव आता अधिक गंभीर, रौद्ररूप धारण करीत आहेत. आता ते वयोगटांवर अवलंबून नाही की आर्थिक परिस्थितीशी ताण -तणावांना काही देणे -घेणे नाही. ही समस्या आता विश्वव्यापी बनली आहे त्यामुळे त्यावर आता सर्वंकष लसीची गरज कधी नव्हे ते निर्माण झाली आहे. […]

इच्छापत्र… काळाची गरज

निवृत्तीचे मिळालेले सर्व पैसे आपल्या मुला/ मुलींच्या नावावर केल्यावर पश्चाताप करणारे बरेच वडीलधारी व्यक्तींबाबत आपण वर्तमानपत्र/ चित्रपट/ नातेवाइक/ शेजारी/ प्रवासात भेटणारी व्यक्ती इतकेच नाही तर काही नाटक आणि टीव्ही वरील मालिकांमध्येसुद्धा आपणास पाहण्यात/ वाचण्यात/ ऐकण्यात येतात, त्याचे प्रमुख कारण आई-वडिलांची जबाबदारी नाकारणाऱ्याची संख्यासुद्धा आपल्याकडे कमी नाही. तरीही प्रत्येक व्यक्तीला असेच वाटत असते की, मला इच्छापत्र/ मृत्युपत्र करण्याची आवश्यकता नाही. सध्याच्या कोरोनाच्या महामारीमध्ये इच्छापत्र का/ कोण/ कसे करावे या बाबत माहितीपर लेख आपल्यासाठी. […]

डायरीतील विस्कटलेली पाने – भाग चार

शेतात पडलेली डायरी मला दिसली आणि न राहवून मी ती उचलली. डायरीची रया गेली होती. एकतर ती जुनी वाटत होती, पण पानांवर जागोजाग चिखलाचे, मातीचे डाग दिसत होते. त्यामुळे पानांवरचा मजकूर काहीसा अस्पष्ट झाला होता. ही डायरी कुणी लिहिली होती, ती अशी शेतात कुणी आणून टाकली याचा काही अंदाज लागत नव्हता. […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३३)

मी मूळचा सातारकर असल्यामुळे साहित्य, कला, संस्कृतीचे बीजांकुर माझ्यात या सातारच्या पंचक्रोशीतच घडले. थोडेसे कळायला लागल्यापासूनच आमच्या घरात जी मोठी विचारवंत माणसं येत असत रहात असत त्यामुळे आणि तसेच समोरच प्रख्यात वकील कै. मनोहरपंत (काका) भागवत वकील रहात होते. त्यांच्याकडे, राजकीय, सामाजिक, साहित्य, अशा क्षेत्रातील अनेक मान्यवर सातत्याने येत असत. आमच्या कुटुंबाचे व त्यांचे अगदी घरचेच संबंध होते. […]

1 208 209 210 211 212 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..