राजर्षी शाहू महाराज
छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचे शाहू, राजर्षी शाहू, चौथे शाहू अशा नावाने प्रसिद्ध होते. छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापुर संस्थानाचे छत्रपती होते. ब्रिटिश राजवटीच्या काळात सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहू महाराजांनी केलं. बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले. महाराजांना राजर्षी ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. […]