लावणीची ‘लाट’
‘सांगते ऐका’ चित्रपटातील ‘ बुगडी माझी, सांडली गंऽऽ’ ही लावणी गाजल्यानंतर तमाशाप्रधान चित्रपटांची निर्मिती वाढू लागली. हंसा वाडकर, जयश्री गडकर, लीला गांधी, उषा चव्हाण, उषा नाईक, जयश्री टी, सुषमा शिरोमणी, रंजना अशा अनेक अभिनेत्रींच्या चित्रपटातील लावण्यांनी रसिकांना वेड लावले. चित्रपती व्ही. शांताराम यांच्या ‘पिंजरा’ चित्रपटातून संध्या या अभिनेत्रीने सादर केलेल्या लावण्यांना अफाट लोकप्रियता मिळाली. […]