नवीन लेखन...

इच्छापत्राचे प्रोबेट करणे भविष्यात गरजेचे आहे का ?

सर्व सामान्य नागरिकांना कायद्यातील तरतुदींच्या समजापेक्षा, गैरसमजच अधिक असतात. अशा चुकीच्या समजुती भविष्यात त्यांना मोठया अडचणीत आणू शकतात. तेव्हा योग्यवेळी कायदेशीर सल्ला घेतल्यास मौल्यवान वेळ वाचण्यास नक्की मदतच होईल. […]

डायरीतील विस्कटलेली पाने – भाग तीन

डायरी अस्ताव्यस्त होती, पण फार जुनी नव्हती. अतिशय रेखीव, सुवाच्य अक्षरात लिहिलेल्या डायरीत, प्रत्येक पानावर एक ओळ आवर्जून लिहिलेली होती. माझ्याच नजरेतून मी उतरत चाललो आहे! डायरी चाळताना प्रत्येक पानावरच्या त्या वाक्याकडे लक्ष जात होतं. मी पानं उलगडू लागलो. […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३१)

मागील भागात मी साहित्यिक देवेंद्रजी वधवा यांचा उल्लेख केला आहेच. पुन्हा एकदा नगरला एका कार्यक्रमाला योग आला. पुण्यातील ज्येष्ठ कवयित्री ऍड. संध्याताई गोळे, काव्यशिल्प पुणेच्या अध्यक्षा कवयित्री ऋचा कर्वे, सुनेत्राताई गायकवाड, विद्याताई देव यांच्या पु.ल. एक साठवण या कार्यक्रमासाठी नगरला निमंत्रण आले होते. या सर्वच कवयीत्री माझ्या सुपरिचित होत्या. […]

न्हाऊ घाल माझ्या मना

प्राणी असो वा पक्षी, त्यांना आंघोळ ही फार प्रिय असते. चिमण्यां थोड्याशा पाण्यात सुद्धा डुबक्या मारुन पंख फडफडवीत आंघोळ करतात. कावळ्याला चार थेंब मिळाले तरी त्याची आंघोळ पूर्ण होते. हत्तीला डुंबायला भरपूर पाणी लागते. म्हशींना एखाद्या डबक्यात गळ्यापर्यंत डुबवून घेतले की, बाहेर यायची इच्छा नसते. मांजर ही आंघोळीच्या ऐवजी स्वतःला चाटून पुसून स्वच्छ करुन पाण्याची बचत करते. […]

दिवाळी अंकांचे जनक काशिनाथ रघुनाथ आजगावकर

रघुनाथ आजगावकर यांना बंगाली भाषा उत्तम येत होती आणि बंगाली संस्कृतीची चांगली माहिती होती. ते बंगाली साहित्याचे अनुवादक होते. त्यांनी १८९५ साली ‘मासिक मनोरंजन’ सुरू केलं आणि पुढे १९०९ साली ‘मासिक मनोरंजन’चा पहिला मराठी दिवाळी अंक काढला होता. […]

का ? हा प्रश्न (मी आणि ती)

का ? हा प्रश्न आपण कुणालाच विचारू नये.असे माझे स्पष्ट मत आहे. तसा मी तिलाही कधीच विचारला नाही. कारण तिच्या ‘ अफाट बुद्धिमतेची’ मला आधीच कल्पना आली होती. खरे तर ती माठ होती माठ . मुख्य म्हणजे तिलाही त्याची कल्पना होती. […]

अमेरिकन कादंबरीकार डॅन ब्राऊन

‘डॅन ब्राऊन’ यांच्या आजवर गाजलेल्या चार प्रमुख कादंबऱ्या हा- ‘द दा विंची कोड’, ‘एंजल्स अ‍ॅन्ड डिमेन्स’, रिसेप्शन पॉइंट’, ‘डिजिटल फॉरेस्ट. यातील ‘द दा विची कोड ही कादंबरी खूप गाजली. २००३ साली प्रसिद्ध झालेली ही कादंबरी पहिल्या आठवड्यातच बेस्ट सेलर ठरली. २००६ पर्यंत जगभर या कादंबरीच्या ६ कोटी प्रती खपल्या. […]

प्रतीक्षा

पसरूनिया दोन्ही बाहू मी उभा तव प्रतीक्षेत भास तुझाच अवकाशी प्रीती पाझरते अंतरात ।।१।। तव स्मृतींतुनी रमता मी न माझाच उरतो श्वासात गंधते कस्तुरी ओठावरी उमलते गीत ।।२।। माहोल, सारा सुगंधी परिमल हा चंदनगंधी सुखवितो या जीवाला लोचनी ओघळते प्रीत ।।३।। आवेग हा भावनांचा व्याकुळ शब्द, शब्द रचितो अलवार काव्य तुझ्याच हृद्य स्मरणात ।।४।। मीच हा […]

भावनिक आरोग्य

संगणक दोन भागांपासून बनविलेला असतो- हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ! मानवी शरीरातील बाहेरची कातडी, हाडे,स्नायू हे दृश्य भाग म्हणजे हार्डवेअर ! आणि मन, भावना, आत्मा हे अदृश्य भाग म्हणजे सॉफ्टवेअर ! मात्र हे दोन्ही घटक आतून एकच असतात. तसेच बाह्य विश्व आणि शरीरातील अदृश्य शक्ती एकमेकांना जोडलेले असतात. भावनिक आरोग्य सॉफ्टवेअरशी संबंधित आहे. आपल्या प्रत्येक कृतीमागे ते असते. […]

1 211 212 213 214 215 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..