नवीन लेखन...

निरंजन – भाग ५२ – सवय

… गुरुदेव म्हणाले की, “मी रजईला गुंडाळले नाहीये, ही रजईच मला घट्ट धरून बसली आहे, मी किती प्रयत्न करतोय यातून स्वतःला सोडवण्याचा… पण मला सहज शक्य होत नाहीये. माझी ही इच्छा आहे की मी ही रजई स्वतःपासून मुक्त करू. […]

व्ही सी आर ते स्मार्टफोन… बालक पालक

बालक पालक हा चित्रपट बघताना प्रत्येकाला बरेच काही आठवत असेल जे पन्नाशीच्या पुढे आहेत विशेष करून ती जी पोरे म्हणा कार्टी म्हणा ते व्ही सी आर आणण्यापासून ते नीलचित्र म्हणजे ब्लु फिल्म बघताना ती संपेपर्यंतचे हावभाव पाहून प्रत्येकाला आपले बालपण आठवत असेल अर्थात स्कालर मंडळी सोडून पण कदाचित. मला आठवतंय जत्रेमध्ये दहा पैसे दिले की तंबूमध्ये […]

हळदीला ठेवलेला आर्केस्ट्रा

हळदीला आर्केस्ट्रा ठेवलेला, पहाटे साडे तीन वाजेपर्यंत आर्केस्ट्रा चालू होता. साडे अकरा बारा वाजेपर्यंत घरातली लहान पोरं आणि स्त्रिया नाचून नाचून दमले आणि एका मागोमाग एक कमी कमी होत गेले. […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३०)

आपण आपले छंद, आवड प्रामाणिकपणे जपले की आपलेच आयुष्य हे समृद्ध, समाधानी होत रहाते. या प्रवासात जसे ज्येष्ठ, श्रेष्ठ प्रस्थापित साहित्यिक भेटले तसे नवोदित कवी, लेखक देखील माझ्या संपर्कात आले. माझी थोडीफार ओळख झाल्यामुळे मला व्याख्यानांसाठी, कार्यक्रमासाठी, पुस्तक प्रकाशनासाठी, निमंत्रणे येत राहिली. पुस्तके छापण्यासाठी तसेच प्रस्तावनेसाठी देखील अनेक पुस्तके माझ्याकडे आली, हे सर्व मी कुठलीही अपेक्षा न करता करत राहिलो. […]

गफूरभाई

दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी नारायण पेठेतील संस्कृती प्रकाशनच्या ऑफिसमध्ये काम करीत होतो. एके दिवशी दुपारी कुरळ्या केसांना भांग पाडलेला, सावळ्या रंगाचा, उंचापुरा माणूस समोर येऊन उभा राहिला. अंगात पांढरा झब्बा, त्यावर निळ्या रंगाचं जाकीट, खाली पांढरी सुरवार व पायात चपला. त्यांना मी ‘या, बसा’ म्हटलं. सुमारे सव्वीस वर्षांनंतर गफूरभाई पुणेकर मला भेटत होते. […]

ज्येष्ठ अभिनेते मा. दत्ताराम

मा. दत्तारामांनी हाताशी आलेली प्रत्येक भूमिका अशीच जिवंत केली. रंगभूमीकडे त्यांनी एक व्रत म्हणून पाहिले आणि व्रताचा सांभाळ देवव्रताच्या निःस्पृह प्रतिज्ञेप्रमाणे त्यांनी आयुष्यभर केला. त्या अर्थाने मास्टर दत्ताराम म्हणजे मराठी रंगभूमीवरचे देवव्रतच. मास्टर दत्ताराम यांनी ‘ मत्स्यगंधा ‘ या नाटकात केलेली देवव्रताची भूमिका विशेष गाजली. […]

पतंग

ती माझ्या लाइफ मध्ये आली ती एक ऍक्सीडेन्ट म्हणून. ती दिसायला मस्त होतीच पण तिचा मूळ गुण म्हणा , अवगुण म्हणा.. एन्जॉय लाईफ… […]

मनातुरता

क्षिणले स्वर आता थकलेली ही लोचने जाहली कातरवेळा वाटते तुजला भेटावे ।।१।। बिंब ते तेजाळलेले सांजेस गुलमुसलेले गगनही अंधारलेले वाटते तुजला भेटावे ।।२।। उचंबळलेल्या भावना मिठीस आसुसलेल्या शिथिल सारीच गात्रे वाटते तुजला भेटावे ।।३।। क्षितीजी रंग केशरी सत्यप्रीत ती आगळी मन स्मरणात गुंतलेले वाटते तुजला भेटावे ।।४।। वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ८० १९ – ६ – […]

‘लघु’ जीवन !

बघता बघता आपले करमणुकीचे जग आक्रसत गेले. चित्रपटाची लांबी खुपायला लागली. दोन तासांपेक्षा जास्त वेळ चित्रपटगृहात बसणे म्हणजे वेस्ट ऑफ टाइम वाटू लागले. नाटके कापून “दोन अंकी” फ्लेवर मध्ये सर्व्ह व्हायला लागली. पुढे जाऊन दीर्घांक ( मध्यंतर विरहित सलग नाट्यानुभव देणारे) सादर व्हायला लागले. टीव्हीवरील मालिका २० मिनिटांमध्ये करमणुकीचा समर्थ डोस देऊ लागल्या. कादंबरीची कथा आणि नंतर “अलक ” ( अति लघु कथा ) झाली. महाकाव्यांच्या “चारोळ्या ” झाल्या. […]

1 212 213 214 215 216 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..