कायदेशीर वारस प्रमाणपत्र आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र याबाबतचे समज आणि गैरसमज
सर्व सामान्य नागरिकांना नेहमीच संभ्रमात टाकणारा विषय म्हणजे वारस विषयक कायद्यातील तरतुदी. ह्या तरतुदी अत्यंत किचकट असून भारतात हिंदूंसाठी (बौद्ध, शीख, जैन, ब्राह्मण समाज,आर्यसमाज, नंबुद्री, लिंगायत) ‘हिंदू वारसा कायदा’, मुस्लिमांसाठी‘मुस्लिम वारसा कायदा’ तर पारसी, ख्रिश्चन, अंग्लो इंडियन आणि इतर सर्व धर्मियांसाठी ‘भारतीय वारसा कायदा’ यातील तरतुदी पहाव्या लागतात. […]