नवीन लेखन...

कृष्णरूप

राऊळी, गाभारी नयन मी मिटलेले अंतरंग उजळलेले भक्तीप्रीतीत रंगलेले ।।१।। रूपडे निळेसावळे कृपासिंधू, कृपाळू ओढ नित्य अनावर भान माझे हरपलेले ।।२।। क्षणक्षण पुण्यपावन भक्तीत रंगगंधलेला ध्यानमग्न मीराराधा कृष्णरूप तेजाळलेले ।।३।। रूप लडिवाळ लाघवी अंतरी साक्ष दयाघनाची निरांजनी दिपवी ज्योत श्वास सारे सुखावलेले ।।४।। वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ७९ १८ – ६ – २०२१.

विनोदी अभिनेता जॉनी वॉकर

जॉनीभाई म्हणतात विनोदी नटासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात एक म्हणजे उत्तम स्क्रिप्ट लेखक दुसरे म्हणजे टायमिंग आणि तिसरे म्हणजे कलाकार कसा स्वतःच्या बुद्धिमतेनुसारं इम्पप्रूव्ह होतो हे आवश्यक असते आणि त्यासाठी भाषा अत्यंत महत्वाची असते, तिच्यावर ताबा असणे आवश्यक असते. त्यांच्या दृष्टीने त्यांना अब्रार अल्वी यांच्याकडे काम करताना मजा येत असे. […]

टपरी नेहमीचीच ठरलेली..

आम्ही कुठेही मोट्या हॉटेलमध्ये खाल्ले तरीपण चहा प्यायला टपरीवर जायचो. ठाण्याच्या गडकरीमध्ये चहा प्यायला जायचो परंतु एका चहासाठी ३० -३२ रुपये टू मच ..वाटत असे, म्हणून जवळच्या टपरीवर सात रुपये कटींग बेस्ट.. […]

बाप

आधार निश्चीन्ततेचा वटवृक्षाचीच सावली साथ शाश्वत निर्भयी सोबत सुखदुःखातली ।।१।। मूक, करडे आभाळ सांत्वनी, आधार हात फक्त निस्वार्थीच दाता जीवनाला सावरणारा ।।२।। हाच खरा भगवंत जगी कृपाळू, कृपावंत सदा घडविणारा, जगविणारा पुजावा, भजावा अंतरी ।।३।। वि. ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ८३. २० – ६ – २०२१.

क्रिकेटपटू बॉब विलीस

भारतीयांना एक सुखद आठवण नेहमीच आठवते ती म्हणजे संदीप पाटील यांनी बॉब विलिसला जे सहा चौकार मारून २४ धावा एका षटकामध्ये केल्या. आजही ते सहा चौकार बघताना बॉब विलिसचा बदललेला चेहरा समोर येतो. […]

स्वतःशी नाते

स्वतःला अलीकडच्या काळात निवांत कधी भेटला आहात ? आणि  स्वतःचं  स्वतःशी असलेलं नातं इतक्यात कधी निरखून पाहिलंय? जन्मल्यापासून आपण फक्त आणि सदैव स्वतःच्याच सान्निध्यात असतो. स्वतःला इतर कोणाहीपेक्षा आपणच अधिक ओळखत असतो. पण हे “ओळखपत्र ” बाह्य असतं की अंतर्गत? वपु म्हणतात- ” ओळखपत्रासारखं विनोदी दुसरं काही नाही. आपण कसे आहोत हे दाखविण्यापेक्षा आपण कसे दिसतो हे ओळखपत्र दाखवतं.” असं तर आपल्याबाबतीत घडत नाही नं, हा प्रश्न एकदातरी स्वतःला विचारायलाच हवा. […]

प्रेरणा

गावातल्या नाक्यावर असलेली जमीन डेव्हलपला देऊन बाळ्याला बिल्डर कडून बिल्डिंग मध्ये तळमजल्यावर चार गाळे मिळाले होते. वरच्या तीन मजल्यावर प्रत्येकी चार याप्रमाणे बारा ब्लॉक पैकी साठ चाळीस च्या हिशोबात पाच ब्लॉक मिळाले त्यापैकी, एका अक्खा मजल्यावर स्वतःला राहण्यासाठी चार ब्लॉक एकत्र करूनही गावातल्या जुन्या घरापेक्षा कमी जागा मिळाली. […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)

शिक्षणतज्ञ, ज्येष्ठ साहित्यिक गुरुवर्य डॉ. न.म. जोशी सरांचा उल्लेख मी बहुतेक सर्वच भागामध्ये केलेला आहेच. नम. जोशी सर मूळ ता.पाटण जिल्हा सातारा येथील शिवाय त्यांचे पुणे येथील वास्तव्य सदाशिव पेठेत. माझे गाव सातारा आणि पुण्यात सदाशिव पेठेत माझ्या मुलाचे ऑफिस. […]

‘पिन कोड’ प्रणालीचे जनक श्रीराम भिकाजी वेलणकर

श्रीराम भिकाजी वेलणकर हे भारतीय टपालखात्याच्या ‘पिन कोड’ प्रणालीचे जनक होते. श्रीराम भिकाजी वेलणकर हे ब्रिटिशांच्या राज्यात आयसीएसंच्या लेखी परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले तरीही त्यांना पोस्ट आणि टेलीग्राफ खात्याच्या तोंडी परीक्षेत ठरवून अनुत्तीर्ण करण्यात आले होते. […]

कस्टम शाॅपी

त्याकाळी वर्तमानपत्रात कस्टमने जप्त केलेल्या वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांच्या जाहिराती असत. काही जाहिराती ‘छोट्या जाहिराती’ सदरात येत असत. पहिल्या पानावर जाहिरात असायची ती ‘घरोंदा’ कस्टम शाॅपीची! त्या जाहिरातीत परदेशी घड्याळे, पर्फ्युम, कॅमेरे, व्हिडिओ कॅमेरे, टेप रेकाॅर्डर, व्हिसीआर, खेळणी यांची यादी व किंमती दिलेल्या असत. […]

1 214 215 216 217 218 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..