नवीन लेखन...

२२ जून १८९७…. गोंद्या आला रे…

२२ जून १८९७. पुण्यात प्लेगची साथ सुरु असताना घराघरात घुसून आमच्या आया बहिणींच्या इभ्रतीवर हात टाकणाऱ्या रँड नावाच्या नराधमाचा चाफेकर बंधूनी वध करुन त्याला यमसदनी धाडले होते. […]

‘अक्षरकार’ कमल शेडगे

कमल शेडगे हे धुरंधर, ज्येष्ठ कलाकार. अक्षरांची कलात्मक मांडणी करून शेडगे शीर्षकाला असं काही रुपडं बहाल करत असत की ते शीर्षक हीच कलाकृतीची ओळख बनत असे. कमल शेडगे यांनी मुद्रित माध्यमात विपुल काम केले असले तरी त्यांची खरी ओळख होती ती टाईम्स समूहातील प्रकाशनांसाठी तसेच नाटक, सिनेमाच्या जाहिरातींसाठी त्यांनी केलेल्या कला दिग्दर्शन व सुलेखनामुळे! […]

अभिनेते टॉम अल्टर

ज्येष्ठ चित्रपट, टीव्ही आणि नाट्य अभिनेते टॉम अल्टर यांचा जन्म २२ जून १९५० मसुरी येथे झाला. सोनेरी केस, निळे डोळे आणि टॉम अल्टर या नावामुळे चटकन अमेरिकन किंवा ब्रिटिश वाटणारा हा ज्येष्ठ अभिनेता-लेखक जन्माने आणि मनाने मात्र पक्का भारतीय होता. […]

आंतरराष्ट्रीय सेल्फी डे

जगातली पहिली सेल्फी घेतला गेला होता तो १८३९ साली. अर्थात त्यावेळी सेल्फी हा शब्द रूढ झाला नव्हता. स्मार्टफोनचा जन्म होण्यापूर्वीही हातात कॅमेरा घेऊन स्वतःची छबी टिपण्याचा प्रयत्न अनेकांनी केला होता. उपलब्ध माहिती नुसार जगातील पहिली सेल्फी १८३९ घेतली गेला. फिलाडेल्फिया येथे एका दिव्यांच्या दुकानाबाहेर रॉबर्ट कॉर्नेलिअस यांनी ही सेल्फी घेतली होती. […]

सारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक

समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’ आहे. नामांकित शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे ‘विद्येचे माहेरघर’ मानले जाते. परंतु नवसाला पावणाऱ्या ‘तळ्यातला गणपती’ने पुणेकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अगदी आत्तापर्यंत हे ठिकाण “तळ्यातला गणपती” याच नावाने ओळखले जायचे. […]

टेलिफोन

आमच्या टेलिफोनमुळे काही विनोदी घटनाही अनुभवास येत होत्या. जेंव्हा सुरवातीला आमच्याकडे टेलिफोन आला तेव्हा आमच्या एका शेजाऱ्याने त्याच्या बायकोला आमच्या फोनवर फोन केला. मी त्याच्या बायकोला जाऊन बोलावून आणलं. यापूर्वी फोनवर कधीही न बोललेली बाई टेलिफोनचा रिसिव्हर हातात धरतात थरथर कापू लागली जणू तिला मलेरियाचा ताप भरलेला असावा. आमच्याच शेजारची दुसरी एक स्त्री टेलिफोनचा रिसिव्हर कानापासून तीन चार इंच लांब धरायची. […]

तिसरे विश्व

ह्या विश्वात खरी मजा असते राव…. कोणीही कितीही नाव ठेवो.. कारण हे विश्व ‘शरीरापलीकडे आणि मनाच्या अल्याड’ असते… […]

डायरीतील विस्कटलेली पाने – भाग एक

डायरी तशी साधीच होती. पण जाडजूड होती. खादीच्या कापडाचं कव्हर होतं. वरवर सुस्थितीत असावी असं वाटत होतं. पण उघडल्यावर मात्र डायरीची पानं विस्कटल्यासारखी दिसत होती. डायरी चाळताना आणखी एक गोष्ट लक्षात आली. सुरुवातीच्या पानांवरचं अक्षर चांगलं होतं. काहीसं मोडी लिपीच्या वळणावर गेलेलं आणि शेवटी शेवट मात्र अक्षरात बदल होत गेलेला दिसत होता. […]

1 215 216 217 218 219 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..