नवीन लेखन...

घर ‘बसल्या’ काम !

कार्यालय आणि घर हे दोन महत्वाचे पण वेगळे कप्पे आपले आयुष्य व्यापून टाकतात. दोन्ही ठिकाणे वेगळी, तेथे असण्याच्या वेळा वेगळ्या, जबाबदाऱ्यांचे स्वरूप वेगळे ! काय सामाईक असेल तर – दोन्ही ठिकाणी “आपण” असतो. घरबसल्या काम कदाचित अधिक मोठ्या प्रमाणावर भविष्यात (कोरोना संकटानंतरही) पर्याय ठरू शकेल तो गांभीर्याने हाताळला तर खूप समस्या सुटू शकतील. कदाचित कोरोनाची जगभरातल्या नोकरदारांसाठी ही आनंददायी भेट ठरेल. […]

शिवजातस्य संभाजी महाराज : उत्तरार्ध

मागील भागामधून, छ. संभाजी महाराजांची जडण घडण कशी झाली ? त्यांच्या राज्याभिषेकाचे महत्व काय ? याबाबत माहिती पहिली. या भागामधून संभाजी राजांची छत्रपती, स्वराज्य रक्षक म्हणून कशी कारकीर्द होती या बाबत माहिती घेणार आहोत. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर छ. संभाजी महाराजांच्या व्यक्तित्वाचा धावता आढावा घेण्याचा एक प्रयत्न…. […]

एस टी डेपो – तुमचा माझा सर्वांचा

महाराष्ट्रातल्या एसटी डेपोचा चेहरा एकसारखा असतो, किंबहुना तो वेगळा  नसतोच. मोठ पटांगण. त्याच्या एकाबाजूने एसटी येण्याचा मार्ग, दुसऱ्या बाजूने बाहेर जाण्याचा मार्ग व मध्यभागी डेपो. येण्याच्या मार्गाच्या सुरवातीला उसाच गुऱ्हाळ, त्याच नाव कनिफनाथ रसवंती गृह. मालक फडतरे बंधू, मला न उलगडलेलं एक कोडं आहे की सगळ्याच उसाच्या गुऱ्हाळाची नावं कनिफनाथ व मालक फडतरे बंधू का ? […]

सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर

दिनयार कॉन्ट्रॅक्टर हे सशक्त अभिनेते म्हणून परिचित होते. दिनयार यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. व्यावसायिक रंगभूमीपासून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. अनेक लोकप्रिय मालिकांमधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. […]

अबानी कथा

कोण ती , मी कॊण ….परंतु आपण एखादे छोटे जरी चांगले काम केले , छोटे जरी झाड लावले तर त्याचा वृक्ष कधी होईल हे सांगता येत नाही त्यासाठी छोटी सुरवातही महत्वाची असते. […]

वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी

मोरेश्वर घैसास गुरुजी यांचे वडील प्रसिद्ध ऋग्वेदी, घनपाठी वेदमहर्षी विनायकभट्ट हरिभट्ट गुरुजी यांनी आपल्या पुढील पिढीलाही वेदांच्या अध्ययनाचा वारसा दिला पाहिजे, या विचारातून त्यांनी पुण्यात राहण्याचे निश्चित केले. सदाशिव पेठेत स्वतःच्या राहत्या खोलीत त्यांनी वेदपाठशाळा सुरू केली. दोन विद्यार्थ्यांना घेऊन १५ ऑक्टोबर १९४५ मध्ये त्यांचे अध्यापन सुरू केले. […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १८)

व्यवसायानिमित्त रोज माझी महाराष्ट्रात जिथे काम असेल तिथे भ्रमंती असे. एक दिवस कामानिमित्त मी कोल्हापूरला होतो. तिथे गुरूराज प्रिंटर्स कोल्हापूरचे श्री. सतीश शिवदे यांचेकडे माझे काम सुरू होते. नातेवाईकच होते. संध्याकाळी वेळ होता म्हणून आम्ही दोघेही रंकाळ्यावर चाट (भेळ) खाण्यासाठी गेलो होतो. तेंव्हा मला शिवदे म्हणाले ” आप्पा समोरून कोण येत आहे त्यांना ओळखले कां.? मी ओळखत नाही म्हणालो, तेंव्हा शिवदे यांनी त्या व्यक्तीला ” अहो नानासो . म्हणून हाक मारली व म्हणाले अहो आप्पा हे नाना म्हणजे ख्यातनाम विख्यात गीतकार जगदीश खेबुडकर आहेत. […]

ठिणगी

शेवंता आपल्या पारू नावाच्या मुलीबरोबर एका खेडेगावात रहात होती. दिवसभर मोलमजुरी करुन आलेला दिवस ढकलत होती. गेल्या अनेक रात्री तिच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. सतत तिला आपल्या तारुण्यात पदार्पण केलेल्या मुलीची चिंता वाटायची. […]

आकाशवाणी कलावंत नीलम प्रभू अर्थात करुणा देव

नीलम प्रभू या अनेक वर्षे आकाशवाणीत कार्यरत होत्या. १९६० च्या दशकात रेडिओ हे मनोरंजनाचे एकमेव साधन असताना त्यांनी आकाशवाणीवर नभोनाट्यातून आपले संवादकौशल्य सादर करायला सुरुवात केली.त्यांचा सहभाग असलेली ‘प्रपंच’ ही कौटुंबिक श्रुतिका महाराष्ट्रात चांगलीच गाजली होती. त्यात त्यांनी मीना वहिनी अर्थात टेकाडे वहिनींची भूमिका केली होती. लहान मुलीची भूमिका असो की मध्यमवयीन गृहिणीची भूमिका असो, की वृद्ध महिलेची असो प्रत्येक भूमिकेला देव या त्या पट्टीचा आवाज देत. ‘आम्ही तिघी’ या नाट्यात त्यांनी आपल्या आवाजाचा करीश्मा दाखवला होता. […]

कलियुगी संस्कृती

पांघरुनी , बेगडी मुखवटे.. सुन्न जगावे ! सुंदर जगती.. क्षणक्षण सारे आव्हानांचे.. जीवाचे , जगणेच कसरती..।।१।। कोण भला अन कोण बुरा ?.. जगती , सारीच सुंदोपसुंदी.. विश्वासाचा नाहीच भरवसां.. स्वार्थापोठी ! साऱ्या संगती..।।२।। नीती , निष्ठा , प्रीती , भक्ती.. टांगलेल्या , आता वेशीवरती.. आज निर्लज्यांची सदैव सद्दी.. स्वाहा:कार ! विध्वंसी नीती..।।३।। कलियुगाचीच , सारी किमया.. […]

1 223 224 225 226 227 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..