खंत मनी ! मी काय प्रार्थू ?
समजावू कसे या मनाला जे शोधिते अजूनही तुला.. आजही लोचनी रूप तूझे.. तुझाच ध्यास या जीवाला.. एकमेकांवरी नि:सिम प्रीती तुझी न माझी, जडली होती पाहता , पाहताच एकमेकां प्रीतीभाव आगळा रुजला.. नि:शब्दुली ! भाषा मनांची अंतरंगी सारीच प्रीतभारली कटाक्षी प्रीती, स्मित लाघवी जगवित होती तनमनांतराला.. जरी निर्व्याज ही सत्यप्रीती प्रारब्ध्ये दुरावाच हा भाळी तुजविण सारे निरर्थ […]