नवीन लेखन...

वर्तमानकाळ म्हणजे काय?

जसा भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे तसा वर्तमानकाळ नाही. काळ क्षणाने मोजला जात असेल तर तो दुसर्‍या क्षणी उरत नाही, त्या क्षणाला परत आणता येत नाही. पुढचे क्षण ह्या क्षणी दिसत नाहीत. मग ‘चालू क्षण’ म्हणजेच वर्तमानकाळ का? तसे असेल तर ‘वर्तमानकाळ’ क्षणभंगूर आहे. […]

क्रिकेट विश्वातले पहिले जुळे बंधू स्टीव्ह वॉ आणि मार्क वॉ

स्टीव्ह एडवर्ड वॉ आणि मार्क एडवर्ड वॉ हे दोघे ऑस्ट्रेलियाचे कर्णधार राहिले आहेत. कसोटी क्रिकेट खेळणारे ते पहिले जुळे बंधू ठरले. स्टीव्ह हा मार्कपेक्षा केवळ चार मिनिटांनी मोठा आहे. […]

जिकडे तिकडे खड्डेच खड्डे..!

भूतलावर कोठेही जा खड्डा पाहायला मिळतोच या खड्ड्याला ना देशाचे बंधन असते ना प्रांताचे ना प्रदेशाचे.. फरक एवढाच की कुठला खड्डा मोठा असेल तर कुठला लहान… कुठला खड्डा मुद्दामहून पडलेला असेल तर कुठला निसर्गतः तयार झाला असेल.. अशी खड्डा निर्मितीची खूप कारणे सांगता येतील.. […]

ट्रान्स – रविवार सकाळचा !

सकाळी सकाळी पत्नीने सारेगामा -कारवा मधील लताचे ” ऐ मालिक तेरे बंदे ” सुरु केलं आणि मीच बघता बघता ट्रान्समध्ये गेलो- ते नितळ प्रार्थना स्वर अलगद स्वतःचे विश्व तयार करीत होते, आणि ध्यान लागल्यासारखा मी त्यामध्ये ओढला गेलो. चक्क तीन मिनिटे समाधी अवस्था मी जगलो. […]

अशी कविता येते

कृष्णासम ही नटखट अवखळ.. लाघवी कवीता हळूच पाऊली येते.. मयुरपिसी मखमली मृदुल करांनी.. अवघे अलगदी चित्त चोरुनी नेते ..।।१।। कदंब तरुच्या साऊलीत या साक्षात बीज प्रतिभेचे फूलते… शब्दफुलांच्या , वटवृक्षावर भावगंधले गीत कोकिळा गाते…।।२।। कालिंदीच्या ! डोहातूनी त्या लय , ताल सप्तसुरांची येते… राधे ! बघ सामोरी कृष्णमुरारी धुन मंजुळ मंजुळ बासुरीची येते…।।३।। शब्दशब्द मनी भाव […]

दारावरची बेल (कथा)

दारावरची बेल वाजली. एक मध्यम वयाची स्त्री उभी होती. जास्त सुन्दर नाही परंतु एकदा मागे वळून बघण्याजोगी… तुम्हीच सतीश चाफेकर का ? ते ‘ मी आणि ती ‘ लिहिणारे तुम्हीच ना…. […]

माझ्या मातीचे गायन !

१९९६ साली माझ्या पत्नीचा दुसरा काव्यसंग्रह ” वाटेवरच्या कविता ” प्रकाशित करण्याचा विचार पुण्यातील नीहारा प्रकाशनाच्या सौ. स्नेहसुधा कुळकर्णी यांनी बोलून दाखविला. मुखपृष्ठाची संकल्पना आमच्या गणपतीपुळे ट्रीपच्या बागेतील एका छायाचित्रावरून सुचली. प्रस्तावनेसाठी सुधीर मोघेंशी संपर्क साधला आणि काहीशा झटापटीनंतर ती मिळाली. (वो कहानी फिर कभी !) प्रश्न उरला – आशीर्वादाचा! यासाठी साहित्य सृष्टीतील आजोबा ” कुसुमाग्रज ” यांच्यापेक्षा अधिक समर्थ व्यक्ती कोण असू शकेल? […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १२)

यातूनच साहित्य , कला संस्कृती यांची जवळीकता , अभिरूची जन्माला आली .. त्यात आणखी जी भर पडली ती माझ्या मुद्रणाच्याव्यवसायामुळे कारण प्रत्यक्षात अनेक साहित्यिक भेटण्याची त्यांच्या सह्या घेण्याची संधी मिळाली .. तेंव्हा पासुनच ही साहित्याभिरूचीची मशागत ही माझ्या पौगण्डावस्थेपासुुनच सुरु झाली हे स्व. कवयित्री शांताबाईं शेळके यांचे वाक्य आज सार्थ वाटते .!… जीवनाला सर्वार्थानं पोषक असा मार्गदर्शक सहवास योगायोगाने लाभला …हेच परमभाग्य ! घरातील वातावरण देखील याला कारणीभूत होते ..!!!! […]

अनाकलनीय हुरहूर

कधी खेळकर तर कधी चिंतातुर.. कधी आनंदी तर कधी उदासीन.. अनाकलनीय हुरहूर ही विलक्षण.. तरीही , उमलते हळुहळु जीवन..।।१।। कालचक्र सृष्टीचे , अखंड अविरत.. तांडव , पंचमहाभूतांचे ऋतूऋतून.. स्पंदनांतुनी , सुखदुःखांचे ओघळ.. ऋणानुबंधी ! सारे संचिती जीवन..।।२।। प्रीतभावनां ! अंकुर मानवतेचा.. प्रीतीविना कां दुजे असते जीवन.. ब्रह्मानंदी ! केवळ स्पर्श प्रीतीचा.. कृपावंती मोक्षदा , कृतार्थ जीवन..।।३।। […]

1 229 230 231 232 233 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..